ADVERTISEMENT

ही माझ्यासाठी मोठी गोष्ट…स्मिता पाटील यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर रिंकू राजगुरूचे मनमोकळं वक्तव्य

rinku rajguru smita patil comparison thoughts : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने स्मिता पाटील यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर प्रतिक्रिया देत ती तुलना स्वतःसाठी सन्मान मानत असल्याचं सांगितलं. तिच्या आगामी आशा चित्रपटापूर्वी केलेलं हे वक्तव्य चर्चेत.
rinku rajguru smita patil comparison thoughts

rinku rajguru smita patil comparison thoughts : सैराटमधून झळकलेली आणि अवघ्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी Rinku Rajguru सध्या तिच्या आगामी आशा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पणानंतर रिंकूने झुंड, झिम्मा २ अशा विविध चित्रपटांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या व्यक्तिमत्त्वाचं, लुक्सचं आणि साधेपणाचंही कौतुक सोशल मीडियावर पाहायला मिळत असतं.

कधीकधी तिच्या लूक आणि अभिनय शैलीमुळे तिला दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी तुलना केली जाते. चाहत्यांकडून येणाऱ्या या प्रतिक्रियांबाबत रिंकूने आता स्पष्ट भूमिका मांडली आहे. नवशक्ती या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतःच्या मनातील भावना मोकळ्या केल्या.

रिंकू म्हणाली, “लोक माझी तुलना स्मिता पाटील यांच्याशी करतात, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या नावाचा उल्लेखही माझ्यासोबत होतो, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी अनेकदा कमेंट्स वाचल्या आहेत—‘तुला पाहिलं की स्मिता पाटील आठवतात’—असं म्हणणं माझ्यासाठी कौतुकास्पद आहे.”

तिने पुढे सांगितलं, “कधी कधी वाईटही वाटतं, कारण त्या काळी त्यांनी जे प्रभावी चित्रपट केले, त्यातील मुद्दे आजही बदललेले नाहीत. अजूनही महिलांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष तेवढाच तीव्र आहे. त्यामुळे मला वाटतं, कितीही वर्षे गेली तरी नारीशक्तीला लढावंच लागतंय. तरीही या विषयांवर आधारित भूमिका मला मिळतात, हे माझ्यासाठी भाग्य आहे.”

रिंकूने स्मिता पाटील यांच्याबद्दलची तिची जुळलेली नाळही सांगितली. “मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्यावरचं ‘स्मिता, स्मित आणि मी’ हे पुस्तक मी वाचलं. ते वाचताना माझ्या स्वभावातील अनेक गोष्टी त्यांच्यासारख्या वाटल्या. त्यांचं निरीक्षण करताना एक वेगळी जवळीक जाणवते,” असं तिने सांगितलं.

हे पण वाचा.. २१ वर्षांची साजिरी जोशी टीव्हीवर करणार धमाकेदार पदार्पण; लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीचा नवा प्रवास सुरू

दरम्यान, रिंकूच्या मुख्य भूमिकेतला आशा हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी वाढत असलेल्या उत्सुकतेसोबत रिंकूच्या प्रामाणिक प्रतिक्रियेमुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे पण वाचा.. ७ महिन्यांत दमदार कमबॅक! नवीन मालिकेच्या सेटवरून वल्लारी विराज ची खास झलक आई औक्षण करत म्हणाली…!

rinku rajguru smita patil comparison thoughts