tula japnar aahe mahima mhatre update : झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. या मालिकांमधील कलाकारही अल्पावधीतच घराघरांत परिचित होतात. अशातच एखादा कलाकार अचानक काही दिवस मालिकेत दिसेनासा झाला, की त्याच्या चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण येतं. अशाच प्रकारची चर्चा सध्या Tula Japnar Aahe मालिकेबाबत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या Tula Japnar Aahe मालिकेत प्रतिक्षा शिवणकर (अंबिका), नीरज गोस्वामी (अथर्व) आणि महिमा म्हात्रे (मीरा) प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांची त्रिकोणी केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर भावली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांच्या शंका वाढू लागल्या आहेत. ती नेमकी कुठे आहे? तिने मालिका सोडली का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
महिमा काही दिवस मालिकेत का दिसत नाही, यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत तिच्याकडेच विचारणा सुरू केली आहे. “तू कुठे आहेस मीरा?”, “मालिकेत पुन्हा केव्हा दिसणार?”, “कृपया मालिका सोडू नकोस” अशा कमेंट्स तिच्या २२ नोव्हेंबरला शेअर केलेल्या पोस्टवर सतत येत आहेत. चाहत्यांची चिंता वाढण्याचं कारण म्हणजे महिमाने ३० नोव्हेंबरनंतर कोणतीही नवी पोस्टही शेअर केलेली नाही.
याच दरम्यान, झी मराठीने Tula Japnar Aahe मालिकेचा एक छोटा प्रोमो रिलीज केला असून, लवकरच मालिकेबाबत महत्त्वाची घोषणा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महिमाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे की ती फक्त तात्पुरत्या ब्रेकनंतर परतणार आहे, याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नुकतीच काही वर्षांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून दिशा परदेशीला आजारपणामुळे अचानक ब्रेक घ्यावा लागला होता. त्यामुळे चाहत्यांना ही परिस्थिती काही नवीन नाही. पण Tula Japnar Aahe मधील मीरा ही भूमिका चाहत्यांच्या आवडीची असल्याने तिच्या अनुपस्थितीने अनेकजण खिन्न झाले आहेत.
हे पण वाचा.. भावना परत आणू शकेल का सिद्धूला? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवा प्रोमो पहा..
महिमा खरोखरच मालिकेतून बाहेर पडली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी झी मराठीकडून अधिकृत अपडेट आल्यानंतरच या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र सोशल मीडियावर मीरा परत येण्याची चाहत्यांची मोठी अपेक्षा दिसून येत आहे.









