ADVERTISEMENT

एक नायिका, दुसरी खलनायिका! लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्रींचा तेलुगू गाण्यावर धमाकेदार डान्स; नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

marathi serial lagna nantar hoiilach prem actresses viral dance video : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या आणि रम्या ऑफस्क्रीन मात्र जिवलग मैत्रीण! दोघींचा तेलुगू गाण्यावरचा झकास डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
marathi serial lagna nantar hoiilach prem actresses viral dance video

marathi serial lagna nantar hoiilach prem actresses viral dance video : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lagna Nantar Hoiilach Prem या मालिकेत सध्या कथानकात प्रचंड रंगत आली आहे. मालिकेतील जीवा-काव्या यांच्या नात्यावर लवकरच मोठा ट्विस्ट येणार असून १६ डिसेंबरच्या भागात त्यांच्या लग्नाआधीचं नातं संपूर्ण देशमुख कुटुंबीयांसमोर उघड होईल, अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या आयुष्यात काय बदल घडणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. वसु आत्या आणि रम्याकडेही त्याविरोधातील पुरावे असल्याचं दाखवल्यामुळे पुढील भाग अधिकच नाट्यमय होणार हे स्पष्ट आहे.

पण मालिकेत एकमेकींशी भांडताना दिसणाऱ्या काव्या आणि रम्याच्या ऑफस्क्रीन नात्याचं अगदी वेगळंच चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन जिथे दोघी सतत भिडत असतात—एक पार्थची बायको आणि दुसरी त्याच्यावर लहानपणापासून प्रेम करणारी—तिथे प्रत्यक्षात या दोन अभिनेत्रींची मैत्री मात्र पक्की आहे. याच मैत्रीचा पुरावा देणारा एक धमाकेदार व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (काव्या) आणि कश्मिरा कुलकर्णी (रम्या) यांनी व्हायरल तेलुगू गाणं Bayilone Ballipalike वर एकत्र डान्स केलेला व्हिडिओ पोस्ट केला आणि काही मिनिटांतच सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला. गायिका मंगलीने गायलेलं हे गाणं सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. खास हूकस्टेपवर आधारित या गाण्यावर दोघींनी केलेला एनर्जेटिक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूप भावला.

या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “हा तर अनपेक्षित कोलॅब!”, “काव्या आणि रम्या एकत्र… हे कसं शक्य?”, “हा तर फुल्ल चमत्कार झाला!”, “आता ट्रेंड पूर्ण झाला!” अशा उत्साहवर्धक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. अनेकांनी तर दोघींच्या डान्सची विशेष प्रशंसा करत त्यांची केमिस्ट्री ‘ऑफस्क्रीनही सुपरहिट’ असल्याचं म्हटलं आहे.

हे पण वाचा.. तीन महिन्यांनंतर घरी परतला प्रणित मोरे; कुटुंबियांचा भावनिक स्वागत सोहळा आणि जंगी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

ऑनस्क्रीन कट्टर शत्रू, ऑफस्क्रीन जिवलग मैत्रीण—Lagna Nantar Hoiilach Prem मधील या दोन अभिनेत्रींच्या बोंबाबोंब डान्स व्हिडिओमुळे मालिकेची लोकप्रियता आणखी वाढताना दिसतेय. प्रेक्षकांसाठी हा अप्रतिम व्हिडिओ म्हणजे एक छोटा सरप्राइजच!

हे पण वाचा.. हा पोरगा खूप डाऊन टू अर्थ!” किरण मानेंची अमित भानुशालीसाठी खास पोस्ट दोघांची भेट तेजस्विनी लोणारीच्या लग्नात

marathi serial lagna nantar hoiilach prem actresses viral dance video