amit bhanushali kiran mane meeting marathi actor : मराठी टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय ठरलेली ‘ठरलं तर मग’ मालिका नुकतीच १००० भागांच्या टप्प्यावर पोहोचली. दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी ही मालिका केवळ कथानकासाठीच नव्हे, तर कलाकारांच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. विशेषतः सायली आणि अर्जुनची जोडी म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी घराघरांत लोकप्रियता कमावली आहे.
याच मालिकेतील प्रमुख कलाकार अमित भानुशाली म्हणजेच ‘अर्जुन’ याने नुकताच एक आनंदाचा क्षण साजरा केला आणि त्याचवेळी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक अनुभवी अभिनेते किरण माने यांनी करताच सोशल मीडियावर दोघांची चर्चा रंगली. अमित भानुशाली किरण माने या दोघांची भेट तेजस्विनी लोणारीच्या लग्नात झाली आणि त्यानंतर किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये अमितबद्दल लिहितात की, “हा पोरगा खूप डाऊन टू अर्थ आहे!” सिने इंडस्ट्रीतील पार्ट्या, अवॉर्ड फंक्शन यामध्ये स्वतःला अवघडल्यासारखं वाटतं, असं ते सांगतात. साताऱ्याचे असल्याने मुंबईत कामापुरतं येणं-जाणं, मित्रांची फारशी गाठीभेटी नाहीत, त्यामुळे अशा समारंभांत ते फार वेळ थांबत नाहीत. पण काही कलाकार असे असतात जे मोठेपणा झुगारून मनापासून भेटतात, बोलतात आणि जिव्हाळ्याची भावना जपतात. त्यातला एक म्हणजे अमित भानुशाली, असं त्यांनी खास नमूद केलं.
तेजस्विनीच्या लग्नात अमित नेहमीप्रमाणेच आपुलकीने भेटल्याचं ते सांगतात. विशेष म्हणजे त्याच दिवशी ठरलं तर मग मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाले होते. “गडी फुल्ल फॉर्ममध्ये आहे, त्याचं मनापासून अभिनंदन केलं,” असं किरण माने यांनी लिहिलं.
या पोस्टखाली अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया देत अमितचं कौतुक केलं. काहींनी तर, “आम्ही मालिका फक्त अर्जुनसाठी पाहतो,” अशी खुलेपणाने कबुलीही दिली.
हे पण वाचा.. निवेदिता-अशोक सराफांच्या घरी थाटात पार पडले रसिका वाखारकरचं पहिलं केळवण; खास भेटीसह अविस्मरणीय क्षण
अमित भानुशाली हा अभिनेता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही तितकाच साधा, जमिनीवरचा आणि मन जिंकणारा आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. किरण माने यांच्या पोस्टमुळे अमित भानुशाली किरण माने ही जोडी चाहत्यांच्या चर्चेत राहिली आणि ‘ठरलं तर मग’च्या टीमसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.
हे पण वाचा.. सगळ्यात सुंदर… ईशा संजय कडून ऐश्वर्या नारकर यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत
amit bhanushali kiran mane meeting marathi actor









