ankita walawalkar pranit more bigg boss post : तीन महिन्यांच्या रंगतदार प्रवासानंतर ‘बिग बॉस १९’ची अखेर सांगता झाली. गौरव खन्नाने ट्रॉफी जिंकत विजेता म्हणून नाव कमावलं, तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. या तगड्या स्पर्धेत मराठमोळा प्रणित मोरेही टॉप ३ मध्ये चमकला, पण अंतिम क्षणी तो बाहेर पडला आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्याच्या या एलिमिनेशननंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात निराशा व्यक्त केली. अनेकांना प्रणितच शोचा खरा विजेता व्हावा अशी आशा होती.
याच पार्श्वभूमीवर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Ankita Walawalkar हिनं प्रणितसाठी खास पोस्ट शेअर केली. शो सुरू झाल्यापासूनच तिनं त्याच्या खेळाचं कौतुक करत त्याला सतत पाठिंबा दिला होता. ग्रँड फिनालेनंतरही तिने त्याच्यावरील आदर आणि प्रेम तिच्या शब्दांतून पुन्हा एकदा दाखवून दिलं.
इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रणितचा फोटो शेअर करत Ankita Walawalkar म्हणाली, “तू संपूर्ण प्रवासात प्रचंड प्रतिष्ठेनं खेळलास… शिवीगाळ नाही, अनावश्यक गोंधळ नाही. मतं फक्त एक कारण असतात, पण आमच्यासाठी तू आधीपासूनच विजेता आहेस.” तिच्या या मनापासूनच्या संदेशाला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे.
एलिमिनेशननंतर प्रणितने स्वतःही आपल्या प्रवासावर भाष्य करत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्याने सलमान खानशी बोलताना सांगितलं की, ‘बिग बॉस’मधील अनुभव त्याच्यासाठी अनपेक्षित आणि अविस्मरणीय होता. अनेकदा नॉमिनेशनमध्ये नाव आलं तरी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे तो प्रत्येक वेळी टिकत राहिला. “लोकांनी मला इतकं साथ दिली, त्यामुळे मलाही काहीतरी वेगळं करायची प्रेरणा मिळाली,” असं प्रणितनं भावूक होत सांगितलं.
तसंच त्याने आपल्या स्टँडअप शोमधून मिळवलेल्या प्रेक्षकांनाच खरा आधार म्हटलं. “माझे प्रेक्षक हेच माझे सर्वात मोठे सपोर्टर आहेत. कुटुंबानंही नेहमी खंबीर साथ दिली,” असं तो म्हणाला.
हे पण वाचा.. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोडले ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’चे अध्यक्षपद; भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा
दरम्यान, प्रणितच्या मोठ्या फॅनबेसनेही सोशल मीडियावर या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, खेळातील प्रामाणिकपणा, सभ्य वर्तन आणि स्वतःची ओळख न बदलता स्पर्धा पूर्ण करण्यासाठी त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे. Ankita Walawalkar च्या भावनिक पोस्टमुळे त्याच्या प्रवासाला आणखी एक सुंदर आठवण लाभली आहे.
हे पण वाचा.. बाळ झाल्यावर मी नैराश्यात गेले…” पल्लवी वैद्य ची भावुक कबुली म्हणाली,मी सतत रडायचे..
ankita walawalkar pranit more bigg boss post










