ADVERTISEMENT

बाळ झाल्यावर मी नैराश्यात गेले…” पल्लवी वैद्य ची भावुक कबुली म्हणाली,मी सतत रडायचे..

pallavi vaidya depression confession interview : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भूमिका साकारणारी पल्लवी वैद्य हिने मुलाच्या जन्मानंतरच्या नैराश्याबद्दल पहिल्यांदाच उघड बोलत हृदयाला चटका लावणारा अनुभव सांगितला.
pallavi vaidya depression confession interview

pallavi vaidya depression confession interview : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि कठीण काळाविषयी सांगितलं. अभिनयक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी ही प्रतिभावान अभिनेत्री बाहेरून कितीही हसतमुख दिसत असली तरी तिच्या आयुष्यात बाळाच्या जन्मानंतर एका वेदनादायी टप्प्याने प्रवेश केला होता, याची कबुली तिने पहिल्यांदाच दिली.

पल्लवी सांगते की लग्नानंतर तिच्या आयुष्यात फारसा बदल झाला नाही. नवरा, सासू, जाऊ या सगळ्यांनी मिळून घर आणि मुलाचं सांभाळून तिला अभिनयासाठी मोकळं केलं. पल्लवी वैद्य म्हणते, “मी फक्त माझं टिफिन घेऊन शूटिंगला जायचे, बाकी सर्व घरच्यांनी हाताळलं.” पण या सुखद वाटणाऱ्या आयुष्यातही एक असा काळ येऊन गेला ज्याने तिला आतून हादरवलं.

मुलाच्या जन्मानंतर तिला एकटेपणा, घाबरट भावना आणि सतत येणाऱ्या अश्रूंनी पछाडलं. “काय होत होतं ते मला कळत नव्हतं. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच रडू लागायचे,” असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. अनेक कलाकारांनी बाळ पाहायला येण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्या काळात पल्लवी कोणालाच सामोरी जाऊ शकत नव्हती. फोन करून नकार देताना तिला स्वतःलाच अपराधी वाटत होतं. “नैराश्यातून बाहेर आल्यावर मी सगळ्यांची माफी मागितली,” असेही तिने नमूद केले.

या परिस्थितीतून बाहेर काढण्यात तिच्या नवऱ्याची मोठी भूमिका होती. पल्लवी वैद्य म्हणते, “तो मला सतत धीर द्यायचा. तुझं मन या अवस्थेत अडकून राहिलं तर तूच त्रासून जाशील, म्हणून तो मला पुन्हा शूटिंगला जाण्यासाठी प्रोत्साहन देत होता.” तिच्या मैत्रिणी आणि आईनेही तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या वेळी कुणाचंच म्हणणं डोक्यात जात नव्हतं, असं ती मनमोकळेपणाने सांगते.

या अनुभवामुळे मातृत्वाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला. “आईची भूमिका करताना मला आता समजतं की त्या काळात एक स्त्री कशा भावनांतून जाते,” असे ती भावूक होत म्हणाली.

हे पण वाचा.. किरण गायकवाड व पत्नी वैष्णवी कल्याणकर गोव्यात जोडप्याचे बीचवरील फोटो चर्चेत

पल्लवी वैद्य च्या या कबुलीनं अनेक महिलांना आधार मिळणार आहे. ती म्हणते, “गरोदरपणात आणि त्यानंतर आईला भावनिक व शारीरिक आधार देणं अत्यंत गरजेचं आहे.” तिच्या खुलाशामुळे समाजात या विषयावर अधिक जागरुकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

हे पण वाचा.. झी मराठीवर येतेय ‘शुभ श्रावणी’ नवी मालिका; ९ वर्षांनी लोकेश गुप्तेचं कमबॅक, दमदार कलाकारांची फौज तयार

pallavi vaidya depression confession interview