ADVERTISEMENT

किरण गायकवाड व पत्नी वैष्णवी कल्याणकर गोव्यात जोडप्याचे बीचवरील फोटो चर्चेत

kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड आणि पत्नी वैष्णवी कल्याणकर गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या जोडप्याचे समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip

kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip : लागिरं झालं जी आणि देवमाणूस या मालिकांमधून आपली खास ओळख निर्माण करणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र यावेळी त्याचे चर्चेत येण्याचे कारण त्याची मालिका नसून त्याचे खासगी आयुष्य आहे. किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर (Kiran Gaikwad Vaishnavi Kalyankar) हे दाम्पत्य सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करत असून, वैष्णवीने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले आहेत.

वैष्णवी कल्याणकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मोरजिम बीचवरील काही सुंदर क्षण शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती हेअरस्टाईल करताना दिसते, तर काही फोटोंमध्ये त्यांच्या आसपासचे वातावरण, खाद्यपदार्थ आणि समुद्रकिनाऱ्याची शांतता प्रतिबिंबित झाली आहे. काही छायाचित्रांमध्ये किरण गायकवाडही दिसत असून त्यांचे रिलॅक्स मूड फोटो पाहणाऱ्यांना भावत आहेत. तिने या पोस्टला “शनिवार, मोरजिम” असे कॅप्शन देत पतीला टॅग केले आहे.

किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. “गोव्यात स्वागत आहे”, “आमच्या गोव्यात देवमाणूस!”, “अप्रतिम दिसताय” अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या. काहींनी तर मालिकेतील त्यांच्या भूमिकांवरून मजेशीर कमेंट्स करत हशा पिकवला. “पोरी नको राहू गं त्याच्याबरोबर, तो जनावर झालाय”, “कुडाळ म्हणलं होतं, पण सरळ गोवा?” अशा विनोदी कमेंट्स प्रेक्षकांच्या मालिकेप्रेमाचा पुरावा देतात.

किरण गायकवाड सध्या देवमाणूस – मधला अध्याय या मालिकेत गोपाळची भूमिका साकारत आहे. त्याच्या या निगेटिव्ह भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळत आहे. दुसरीकडे, वैष्णवी कल्याणकर स्टार प्रवाहवरील काजळमाया मालिकेत आभाची प्रमुख भूमिका निभावत असून ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

हे पण वाचा.. झी मराठीवर येतेय ‘शुभ श्रावणी’ नवी मालिका; ९ वर्षांनी लोकेश गुप्तेचं कमबॅक, दमदार कलाकारांची फौज तयार

दरम्यान, चाहत्यांनी सुट्टीवर गेलेल्या किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर जोडप्याचे फोटो पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकांमधील तीव्र आणि गंभीर भूमिका निभावणारे हे दोघे वास्तव आयुष्यात इतके साधे, हसरे आणि आनंदी दिसतात, हे पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत.

हे पण वाचा.. मेहंदीवर कुत्र्याचं चित्र का काढलं पूजाने? आदेश बांदेकरांनी सांगितलं खरं कारण

kiran gaikwad vaishnavi kalyankar goa trip