shubh shravani zee marathi new serial : झी मराठीने आपल्या नव्या मालिकेची घोषणा करताच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपासून या मालिकेबाबत गुढता ठेवण्यात आली होती. नाव, कलाकार, कथा – काहीच उघड करण्यात आले नव्हते. मात्र, शनिवारी रात्री दाखवण्यात आलेल्या प्रोमोने ‘Shubh Shravani’ या मालिकेचा पहिला पडदा उघडला आणि कलाकारांची भव्य यादी समोर आली.
या मालिकेद्वारे अभिनेत्री वल्लरी विराज पुन्हा एकदा वाहिनीवर मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. तिच्यासोबत सुमित विजयही प्रमुख भूमिकेत दिसणार असून, दोघांची जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. ‘Shubh Shravani’ या मालिकेच्या कथेत प्रेम, कौटुंबिक नातेसंबंध आणि आधुनिक भावविश्व यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यातील खास आकर्षण म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता लोकेश गुप्ते यांचं नऊ वर्षांनंतरचं दमदार कमबॅक. ‘वादळवाट’, ‘आभास हा’, ‘लज्जा’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या स्मरणीय भूमिकांमुळे त्यांचा छोट्या पडद्यावर पुनरागमन प्रेक्षकांसाठी मोठी भेट ठरणार आहे. ‘Shubh Shravani’ मध्ये ते महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्या उपस्थितीने मालिकेची लयच बदलणार आहे.
याशिवाय आसावरी जोशी, जुई तनपुरे आणि कोमल शेटे यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीही या मालिकेत झळकणार असल्याचं समजतं. दमदार कलाकारांची ही मांदियाळी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करणार आहे.
मालिकेची कथा ‘शुभंकर’ आणि ‘श्रावणी’ या दोन भिन्न जगातल्या व्यक्तींच्या नात्यावर आधारित आहे. प्रेमाने भरलेल्या घरातील शुभंकर आणि ऐश्वर्यशाली वातावरणात वाढलेली श्रावणी – या दोघांची सुरू होणारी गोड सफर प्रेक्षकांना नव्या रोमँटिक प्रवासावर नेणार आहे. त्यांची नाते जुळत असताना उद्भवणारे प्रसंग, संघर्ष आणि नात्यातील भावनिक क्षण मालिकेला अधिक रंगतदार करतील.
हे पण वाचा.. समरचा उद्धटपणा पाहून स्वानंदी नाराज; ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या नव्या प्रोमोवर नेटकरी भडकले
झी मराठीने अद्याप ‘Shubh Shravani’ च्या टेलिकास्टची नेमकी तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. मात्र, जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. आता प्रेक्षकांना फक्त सोशल मीडियावर मालिकेचा संपूर्ण प्रोमो कधी झळकतोय याची प्रतीक्षा आहे. दमदार कलाकार, आकर्षक कथा आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली ही नवीन मालिका मराठी मनोरंजनविश्वात नक्कीच नवी भर घालणार आहे.
हे पण वाचा.. मेहंदीवर कुत्र्याचं चित्र का काढलं पूजाने? आदेश बांदेकरांनी सांगितलं खरं कारण









