ADVERTISEMENT

मेहंदीवर कुत्र्याचं चित्र का काढलं पूजाने? आदेश बांदेकरांनी सांगितलं खरं कारण

pooja birari mehendi reason : अभिनेत्री पूजा बिरारी हिने मेहंदी सोहळ्यात हातावर काढलेल्या कुत्र्याच्या चित्रामागे खास कौटुंबिक कारण दडलं होतं. आदेश बांदेकरांनी उघड केलेल्या या खुलाशाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
pooja birari mehendi reason

pooja birari mehendi reason  : अभिनेता आणि लोकप्रिय सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री Pooja Birari यांचा २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेला लग्नसोहळा सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दोघांच्या लग्नातील विधी, फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना, पूजाच्या मेहंदी सोहळ्यातील एका खास डिझाईनने मात्र सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. तिच्या हातावरील कुत्र्याच्या आकृतीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, काहींनी तर तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या डिझाईनमागे एक भावनिक गोष्ट दडली असल्याचं आदेश बांदेकरांनी स्पष्ट केले आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमात Pooja Birari हिने हातावर काढलेलं ते कुत्र्याचं चित्र साधं नव्हतं. तो म्हणजे बांदेकर कुटुंबाचा लाडका सदस्य ‘सिंबा’. आदेश बांदेकर यांनी सांगितल्यानुसार, सिंबा त्यांच्या कुटुंबात सोहम लहान असतानाच आला होता. गेली १७ वर्षं तो बांदेकर परिवाराचा अविभाज्य भाग आहे. आता वयामुळे त्याची तब्येत थकलेली असली, चालणं-फिरणं जड जात असलं, तरीही त्याची काळजी लहान मुलाप्रमाणे घेतली जाते. सिंबाला सोहमजवळच झोपायची सवय आहे आणि घरातील प्रत्येकजण त्याच्याशी तितक्याच मायेने वागतो.

सोहमला स्वतःच्या लग्नातही सिंबा उपस्थित असावा असं मनापासून वाटत होतं. मात्र प्रवास आणि गर्दी त्याच्यासाठी त्रासदायक ठरू शकत असल्याने तो निर्णय शक्य झाला नाही. पूजाही सिंबाला तितकीच जिवापाड आवडते. त्यामुळे सोहमच्या मनातील भावनांचा विचार करून तिने आपल्या मेहंदीवर सिंबाचं प्रतिकात्मक चित्र काढून त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

आदेश बांदेकरांनी केलेल्या या खुलासनंतर चाहत्यांनी पूजाच्या या भावनिक निर्णयाचं कौतुक केलं आहे. लग्नसोहळ्यांमध्ये नव्या ट्रेंड्सची रेलचेल असली तरी, पूजानं परंपरेसोबत आपुलकीची जोड दिल्याने तिच्या मेहंदीचा अर्थच अधिक खास ठरला आहे.

हे पण वाचा.. समरचा उद्धटपणा पाहून स्वानंदी नाराज; ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या नव्या प्रोमोवर नेटकरी भडकले

Pooja Birari आणि सोहमच्या लग्नाला आलेल्या या अनोख्या आठवणीमुळे त्यांचा खास दिवस आणखी संस्मरणीय झाला आहे.

हे पण वाचा.. साखरपुडा मोडणार! कमळी मालिकेत कमळी उघड करणार कामिनीचा डाव; अन्नपूर्णा आजींचा जोरदार थप्पड ट्विस्ट

pooja birari mehendi reason