Laxmi Niwas Jayant Janhvi New Twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना सतत नवीन वळणांनी गुंतवून ठेवत आहे. सिद्धूच्या अटकेनंतर मालिकेत अनेक रहस्यांची उकल होत असताना आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या खुलाशामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली असून मालिकेतील पुढील भागात नेमकं काय घडणार याची चर्चा रंगू लागली आहे.
कथेप्रमाणे, काही दिवसांपूर्वी जान्हवी जयंतच्या त्रासाला वैतागून घर सोडते आणि समुद्रात उडी मारते. सर्वांना ती गेलेली असल्याचं वाटत असताना ती प्रत्यक्षात जिवंत असते आणि तिच्या मित्र विश्वा म्हणजेच मॅडच्या घरी आश्रय घेते. मात्र, विश्वाचं घर असल्याचं तिला सुरुवातीला माहीत नसतं. त्याच घरात ती सईसाठी सरप्राइजची तयारी करण्यात गुंतलेली दिसते, तिचं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी मदत करताना प्रेक्षकांना दिसत आहे.
दुसरीकडे जयंतला विश्वा जान्हवीचा जुना आणि जवळचा मित्र असल्याचं माहीत असलं तरी जान्हवी जिवंत आहे याची कल्पनाही नसते. अशावस्थेत Laxmi Niwas मालिकेचा नवीन प्रोमो चाहत्यांसमोर आल्यानंतर वातावरणच बदललं. प्रोमोमध्ये सईला विश्वाने केलेलं सरप्राइज आवडल्याचं दिसतं, तर जान्हवी दूरून हे सर्व पाहून भावूक होते.
याच क्षणी जयंत अचानक विश्वाच्या घरात येतो आणि तिथे जान्हवी दिसताच त्याला अक्षरशः धक्का बसतो. तिचं अस्तित्व अजून जिवंत आहे, ती त्याच्याकडून लपून इथे राहत आहे, यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि वेदना दोन्ही उघड दिसतात. या अनपेक्षित परिस्थितीने कथानकाला नवा वेग मिळाला आहे.
आता जयंत जान्हवीसमोर काय बोलेल? दोघांचं नातं पुन्हा जुळण्याची शक्यता आहे का? की या भेटीने त्यांच्या नात्यात आणखी गुंतागुंत निर्माण होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.
हे पण वाचा.. फिटनेस आणि अॅसिडिटी नियंत्रणासाठी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरचा सोपा पण प्रभावी फॉर्म्युला म्हणाली
लक्ष्मी निवास मालिकेच्या या प्रोमोने सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगवल्या असून पुढील काही भाग नक्कीच धमाकेदार ठरणार आहेत.
हे पण वाचा.. लग्नानंतर पार पडलं प्राजक्ता गायकवाडचं जागरण गोंधळ, खास व्हिडिओ









