ADVERTISEMENT

कुंभपूर्व वृक्षतोडीविरोधात अनिता दाते तपोवनातील १८०० झाडांच्या संरक्षणासाठी जोरदार आवाज

anita date tapovan tree cutting protest nashik : नाशिकच्या तपोवन परिसरातील १८०० झाडं तोडण्याच्या प्रस्तावाविरोधात अभिनेत्री Anita Date थेट आंदोलनात उतरली असून पर्यावरण रक्षणाची ठाम भूमिका तिने स्पष्ट केली आहे.
anita date tapovan tree cutting protest nashik

anita date tapovan tree cutting protest nashik : नाशिकमध्ये येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असला तरी त्याचवेळी तपोवन परिसरात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीने वादाला तोंड फुटले आहे. साधुग्राम या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी तब्बल १८०० झाडं हटवण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेकडून पुढे आला असून, या कृतीविरोधात राज्यभरातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या आंदोलनात शहरातील पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, विविध संस्था तसेच कलाकारही एकवटले असून त्यात अभिनेत्री Anita Date हिनेही थेट सहभाग नोंदवला आहे.

नाशिकची लेक असलेल्या अनिता दातेनं स्वतःच्या शहरात घडत असलेल्या या पर्यावरण हानीबद्दल तीव्र आक्षेप घेतला. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना तिने झाडं तोडण्याच्या प्रस्तावावर कठोर टीका केली. “आपल्या निसर्गाशी आणि ओळखीशी जोडलेला तपोवनाचा परिसर उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही,” असे म्हणत तिने प्रशासनाचा निषेध नोंदवला.

या परिसरातील झाडं, झुडपं, नदीकिनारीचा नैसर्गिक पट्टा यांच्याशी नाशिककरांचं भावनिक आणि पर्यावरणीय नातं जोडलेलं असल्याचं तिने स्पष्ट केलं. पैसा आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाचे होणारे नुकसान किती धोकादायक आहे, हे सांगताना अनिता म्हणाली, “विकास आवश्यक आहे, पण जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आरोग्य. आणि ते टिकवायचं असेल तर निसर्ग वाचवणं अपरिहार्य आहे. झाडं कापून कोणाचंच भलं होणार नाही.”

अनिताने तपोवनातील वनराईतील प्रत्येक घटक जपला पाहिजे यावर भर दिला. ती पुढे म्हणाली, “इथला एकेक पानही इथेच राहायला हवं. इथल्या प्रत्येक गोष्टीत प्राण आहे. या परिसराला काहीही हानी पोहोचू नये, हीच आमची मागणी आहे.” कलाकार म्हणून तिला असा विकास मंजूर नसल्याचेही ती ठामपणे म्हणाली. नाट्यगृह, सांस्कृतिक सुविधा असाव्यात, पण त्यासाठी झाडं तोडण्याची गरज नाही; आवश्यक असेल तर कलाकार रस्त्यावर किंवा झाडाखालीही नाटक करायला तयार आहेत, असं अनिताने ठणकावलं.

सरकारने या वृक्षतोडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी तीव्र मागणी Anita Date हिने केली. एकीकडे ‘हरितकुंभ’चा नारा आणि दुसरीकडे हजारो झाडं तोडण्याचा प्रस्ताव हा मोठा विरोधाभास असल्याचेही तीने स्पष्टपणे अधोरेखित केले.

हे पण वाचा.. कन्यारत्नाचा जन्म! ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अमोल नाईक झाला बाबा लेकीचं नावही जाहीर करत म्हणाला..

तपोवनातील या संघर्षामुळे नाशिकमध्ये पर्यावरण रक्षणाची लढाई अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

हे पण वाचा.. मराठी माणूस मराठी कलाकाराला…स्वप्नील जोशीच्या रहस्यमय पोस्टने वाढवली उत्सुकता; अभिनेता नेमकं काय जाहीर करणार?

anita date tapovan tree cutting protest nashik