ADVERTISEMENT

मराठी माणूस मराठी कलाकाराला…स्वप्नील जोशीच्या रहस्यमय पोस्टने वाढवली उत्सुकता; अभिनेता नेमकं काय जाहीर करणार?

swapnil joshi new instagram post : अभिनेता स्वप्नील जोशी ने शेअर केलेल्या खास ऑडिओ पोस्टनं चाहत्यांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. “खूप दिवसांनी तुमच्याशी…” अशा शब्दांनी सुरू झालेल्या या संवादातून तो लवकरच महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
swapnil joshi new instagram post

swapnil joshi new instagram post : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता  पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अभिनय क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेला स्वप्नील जोशी अनेक मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. श्रीकृष्ण मालिकेतील बालकलाकारापासून दुनियादारी, मितवा, मुंबई पुणे मुंबई सारख्या चित्रपटांपर्यंत त्याचा प्रवास सातत्याने उंचावत गेला आहे.

सोशल मीडियावरही Swapnil Joshi आपले विचार, आठवणी आणि अनुभव मोकळेपणाने शेअर करत असतो. मात्र या वेळी त्याने पोस्ट केलेली एक साधी वाटणारी पण रहस्यपूर्ण ऑडिओ नोट प्रेक्षक आणि इंडस्ट्री दोघांच्याही चर्चेचा विषय ठरली आहे. “नमस्कार, खूप दिवसांनी तुमच्याशी असा संवाद साधतोय…” अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या या ऑडिओमध्ये स्वप्नीलने आपल्या बालकलाकार ते आजच्या प्रवासाची आठवण करून दिली.

बालपणी केलेल्या ‘उत्तर रामायण’ आणि ‘श्रीकृष्ण’ मालिकांपासून ‘अमानत’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘कहता है दिल’ या हिंदी सिरियल्सपर्यंत, तसेच ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘फू बाई फू’ सारख्या शोमधील अनुभव तो प्रेमाने सांगतो. त्यानंतर स्वप्नीलने पुढे एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली—“मराठी माणूस मराठी कलाकाराला सातत्याने एक प्रश्न विचारतो… आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली आहे.” मात्र त्याने उत्तर काय, हे सांगितले नाही.

कॅप्शनमध्ये त्याने केवळ, “बाकी उद्या सांगतो” एवढेच लिहिल्याने रहस्य अधिकच गडद झाले. आता नेमकं स्वप्नील काय जाहीर करणार? हा प्रश्न लाखोंच्या मनात निर्माण झाला आहे.

त्याच्या या पोस्टखाली प्राजक्ता माळी, भाग्यश्री मोटे, शिवानी सुर्वे यांसारख्या कलाकारांनी “वाट पाहतोय” अशी कमेंट करत उत्सुकता व्यक्त केली. चाहत्यांमध्ये मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. बरेच जण Swapnil Joshi अमृता खानविलकरसोबत “लग्न पंचमी” या नाटकात काम करणार असल्याचा अंदाज वर्तवत आहेत. काहींनी तर “डिसेंबरच्या पंचमीला जाहीर करणार बहुतेक” असेही लिहिले आहे.

दरम्यान, अमृता खानविलकरनेही एक व्हिडीओ शेअर करून नाटकातील तिच्या सहकलाकाराबद्दल उत्सुकता वाढवली आहे. तिच्यासोबत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी ही चर्चा करताना दिसतात.

हे पण वाचा.. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी पोहोचली प्राजक्ता गायकवाड फटाके, रांगोळी आणि ओवाळणीने कुटुंबीयांनी केले स्वागत

दोघांनीही उद्या महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे संकेत दिल्यामुळे चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे—स्वप्नील जोशी खरोखरच “लग्न पंचमी” मध्ये दिसणार का?

उत्तर उद्या मिळेल, पण सध्या तरी स्वप्नीलच्या या पोस्टने नक्कीच सोशल मीडियावर उत्सुकता ताणली आहे.

हे पण वाचा.. तेजस्विनी लोणारी अडकली विवाह बंधनात, मुंबईत पार पडला शाही विवाह

swapnil joshi new instagram post