ADVERTISEMENT

प्राजक्ता गायकवाडचा भावुक डान्स व्हायरल; आई-बाबांच्या डोळ्यात आले पाणी!

prajakta gaikwad wedding video going viral : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. लग्नातील संगीत समारंभात प्राजक्ताने आई-बाबांसाठी केलेला डान्स पाहून सर्व भावुक झाले असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
prajakta gaikwad wedding video going viral

prajakta gaikwad wedding video going viral : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री Prajakta Gaikwad अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण २ डिसेंबर रोजी साजरा झाला. प्राजक्ताने शंभुराज खुटवड याच्याशी विवाह केला असून या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रासह राजकीय जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला.

या लग्नाचा आणि संगीत समारंभाचा जल्लोष सध्या सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच १ डिसेंबरला पार पडलेल्या संगीत समारंभात प्राजक्ताने आपल्या आई-वडिलांसाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. “सच है कि भगवान है” आणि “थागों से बांधा” या गाण्यांवर तिच्या भावपूर्ण नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. लाडक्या लेकीचा हा डान्स पाहताना तिच्या आईलाही अश्रू अनावर झाले, तर प्राजक्ताही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही.

त्या रात्रीचा माहोल पूर्णपणे भावनिक आणि आनंदाने भारलेला होता. या खास प्रसंगी Prajakta Gaikwad ने जांभळ्या रंगाचा देखणा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे, प्राजक्ता आणि तिच्या आईने एकसारख्या रंगातील पोशाख घालून ‘ट्विनिंग’ लूक साकारला होता, जो चाहत्यांच्या मनाला भिडला.

या समारंभात प्राजक्ताच्या सासुबाईंनीही आपल्या सुनेसाठी नाचत आनंद व्यक्त केला. दोन्ही कुटुंबांनी या कार्यक्रमात एकत्र नाचून, हसून, एकमेकांवरील प्रेम अधिक दृढ केलं. मुलीचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांसाठी भावनिक क्षण असतो, आणि प्राजक्ताच्या या सोहळ्यातील क्षणांनीही सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं.

प्राजक्ताच्या लग्नात ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, रमेश परदेशी आणि हार्दिक जोशी यांसारखे कलाकार हजर होते. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटात झळकली होती. तसेच, ‘आई माझी काळुबाई’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत.

हे पण वाचा.. प्राजक्ता गायकवाडच्या रिसेप्शनला कोकण हार्टेड गर्लची धम्माल एंट्री; ‘मुली नेहमीच बरोबर’ म्हणत शंभूराजला दिला मजेशीर सल्ला

सोशल मीडियावर सध्या Prajakta Gaikwad च्या या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, ‘लाडकी लेक आता सासरी निघाली’ या भावनिक भावनेने सर्वत्र वातावरण भारलेले दिसत आहे.

हे पण वाचा.. पूजा बिरारी–सोहम बांदेकर लग्न : पूजाची पाठवणी, सुचित्रा बांदेकरांचा सूनमुख विधी चर्चेत

prajakta gaikwad wedding video going viral