ADVERTISEMENT

पूजा बिरारीच्या घरी लगीनसोहळ्याची धामधूम; सोहम-पूजाच्या नव्या प्रवासाची चाहत्यांत उत्सुकता!

pooja birari soham bhandekar wedding rituals : अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना जलद गतीने सुरुवात झाली असून कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच पूजा आणि सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत चाहत्यांना खात्री मिळाली आहे.
pooja birari soham bhandekar wedding rituals

pooja birari soham bhandekar wedding rituals : मराठी टीव्ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री Pooja Birari सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. काही दिवसांपासून तिच्या लग्नाची चर्चा मनोरंजनविश्वात रंगत असून आता या बातम्यांना अधिक रंगत आणणारे फोटो स्वतः पूजाच्या कुटुंबीयांनी शेअर केले आहेत. घरी सुरू झालेल्या लग्नाच्या तयारीमुळे बिरारी परिवारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पूजा बिरारीने ‘स्वाभिमान’ आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ सारख्या मालिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मालिकांच्या सेटवर पूजाचं खास केळवण सोहळा साजरा करण्यात आला होता. त्या वेळी तिने होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर विशेष चर्चेत आला होता. “घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर… माझे अहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर!” असा मजेशीर उखाणा पूजाच्या चेहऱ्यावरची भावूकता आणि उत्सुकता दोन्ही एकाच वेळी दाखवून गेला.

आता पूजाच्या घरी सुरू झालेल्या पारंपरिक विधींचे फोटो समोर आले आहेत. ‘लडकीवाले’ असे खास कॅप्शन देत तिच्या कुटुंबीयांनी शेअर केलेल्या छायाचित्रांत घरात जमलेल्या पाहुण्यांची लगबग स्पष्ट दिसत आहे. पूजाने डोक्यावर पारंपरिक मुंडावळ्या बांधून केलेला लूक चाहत्यांना विशेष भावला आहे. “आमची गोड नवरी तयार झाली आहे,” असे तिच्या जवळच्या व्यक्तींनी कॅप्शन देत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दुसऱ्या बाजूला, सोहम बांदेकरचंही केळवण त्याच्या जवळच्या कलाकारांनी गोड गप्पा आणि प्रेमळ आठवणींनी साजरं केलं. शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि अभिजीत केळकर यांनी या सोहळ्यात त्याला खास शुभेच्छा दिल्या. सोहम सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहत असून लग्नाच्या तयारीसोबत त्याची व्यावसायिक धावपळही सुरूच आहे.

हे पण वाचा.. पूजा बिरारी मेहंदी सोहळा सोहम बांदेकरसाठी पूजाची पहिली पोस्ट चर्चेत

पूजा आणि सोहम यांच्या लग्नाचा मुहूर्त कधी आहे याची अधिकृत घोषणा अद्याप समोर आली नसली तरी दोन्ही घरांत सुरू झालेली लगबग पाहता हा सुंदर सोहळा लवकरच पार पडणार हे निश्चित आहे. चाहत्यांमध्ये मात्र Pooja Birari हिच्या या नव्या प्रवासाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

हे पण वाचा.. सूरज चव्हाणच्या साखरपुड्यात जान्हवीची ‘झटपट’ मदत; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल