ADVERTISEMENT

सूरज चव्हाण च्या घरी लग्नसोहळ्याची लगबग; हळद–मेहंदीचे विधी पार, व्हिडीओ झाली चर्चेत

suraj chavan wedding haldi mehendi rituals video : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण आता विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला असून त्याच्या घरी सुरू झालेल्या हळद–मेहंदी समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
suraj chavan wedding haldi mehendi rituals video

suraj chavan wedding haldi mehendi rituals video : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता म्हणून घराघरात ओळख निर्माण केलेला Suraj Chavan आता आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. २९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील सासवड येथे त्याचा विवाह सोहळा पार पडणार असून या निमित्ताने त्याच्या घरी लग्नाआधीच्या विधींची सुरुवात जोशात झाली आहे. हळद आणि मेहंदी समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून चाहत्यांमध्ये या सेलिब्रेशनची चर्चाच सुरु आहे.

सूरज आणि त्याची होणारी पत्नी संजना गोफणे यांच्या मेहंदी समारंभाची झलक काही दिवसांपूर्वीच समोर आली. संजनाच्या हातावर काढलेल्या मेहंदीमध्ये सूरजचा प्रसिद्ध ‘झापुक-झुपूक’ हा संवाद खास रेखाटण्यात आला असून तो पाहताच चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. पारंपरिक पोशाखात सजलेल्या या दोघांनी मेहंदीच्या कार्यक्रमात मनसोक्त आनंद लुटल्याचंही दिसून आलं.

यासोबतच सूरजच्या राहत्या घरी हळदीचा समारंभ देखील उत्साहात पार पडला. पिवळ्या फुलांनी सजवलेल्या अंगणात कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सूरजवर हळद लावण्याचा विधी साजरा करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम ‘_lone_wolf’ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर झाल्यानंतर व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाला.

सूरजने काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘ड्रीम होम’मध्ये गृहप्रवेश केला होता. लग्नाआधीच आपल्या होणाऱ्या पत्नीचं स्वागत नव्या घरात करण्याचा त्याचा आनंदही चाहत्यांनी पाहिला. घराला सुंदर लाईट्स आणि फुलांनी सजवून संपूर्ण वातावरणच लग्नसोहळ्यासारखं बनवलं होतं. याच ठिकाणी घाणे भरणं, मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम झाले.

विधींच्या सुरुवातीपूर्वी सूरजने विठ्ठलाची पूजा करून आपल्या आई-वडिलांना भावपूर्ण अभिवादन केलं. बालवयात पालकांचे छत्र हरवले असले तरी त्यांच्या आठवणी आणि संस्कार घेऊन तो आयुष्यातील या नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. कार्यक्रमानंतर त्याच्या बहिणींनी एकत्र येऊन औक्षण केलं आणि त्याला शुभाशिर्वाद दिले.

हे पण वाचा.. प्राजक्ता गायकवाडच्या घरी लगीनसोहळ्याची धामधूम; घाणा व बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला

२९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.११ वाजता मुहूर्त असून याच वेळी Suraj Chavan आणि संजना लग्नबंधनात अडकणार आहेत. कुटुंबातील नात्यातील असलेल्या या दोघांच्या विवाहाची चाहत्यांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली आहे आणि सूरजच्या फॅनपेजवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.

हे पण वाचा.. लाखात एक आमचा दादा फेम शुभम पाटील च्या लग्नसोहळ्याचा मनमोहक व्हिडीओ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

suraj chavan wedding haldi mehendi rituals video