prajakta gaikwad wedding preparations ceremony : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्या आयुष्यातील मोठा दिवस आता हाताच्या अंतरावर येऊन ठेपला आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्नाची आनंदवार्ता चाहत्यांना देत तिने सर्वांना सुखद धक्का दिला होता. ऑगस्टमध्ये थाटामाटात झालेल्या साखरपुड्यानंतर आता तिच्या विवाहसोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर लग्नपत्रिका दाखवत २ डिसेंबर हा तिच्या लग्नाचा मुहूर्त असल्याचं जाहीर केलं. त्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये तसेच उद्योगातील तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली.
आता घरातल्या लग्नपूर्व विधींमध्ये रंगत आणखीच वाढली आहे. नातेवाईक घरात जमू लागल्याने प्राजक्ताच्या घरात सतत गजबजलेले वातावरण दिसत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचं संपूर्ण घर पाहुण्यांनी आणि आनंदी वातावरणाने भरून गेल्याचं स्पष्ट दिसतं. त्यातल्या त्यात आजचा दिवस खास ठरला कारण प्राजक्ताच्या घरी घाणा भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर भावी वधूच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरायची सुंदर प्रथा देखील आजच पार पाडण्यात आली.
या प्रसंगी प्राजक्ता गायकवाडने गडद गुलाबी रंगाची आकर्षक साडी नेसली होती. साधी पण दर्जेदार वेणी, नाकातील नथ, हातात मोजक्या पण उठून दिसणाऱ्या बांगड्या—या सर्व मराठमोळ्या लूकमुळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली. तिच्या कुटुंबीयांनी मजेत, प्रेमाने तिची नजर काढतानाचे क्षणही व्हिडिओमध्ये दिसत होते आणि या छोट्या क्षणांनी चाहत्यांचेही मन जिंकले
प्राजक्ता २ डिसेंबरला दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा होणारा पती शंभुराज खुटवड हे व्यवसायिक असून दोघांची पहिली भेट एका अनपेक्षित प्रसंगातून झाली होती. प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकची धडक बसल्यानंतर त्या ट्रकचे मालक असलेले शंभुराज सेटवर तिची भेट घेण्यासाठी गेले आणि तिथून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. काही दिवसांतच दोघांमध्ये मैत्रीची गाठ बांधली गेली आणि पुढे शंभुराज यांनी तिला लग्नाची मागणी घातली.
हे पण वाचा.. तो चिखल अंगावर ओतताना… शीतल क्षीरसागर चा खास अनुभव; अभिनेत्रीने उघड केला ‘त्या’ सीनचा रोमांचक किस्सा
आता या दोघांच्या लग्नाला कोणकोण सेलिब्रिटी उपस्थित राहतील, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पण सध्या तरी प्राजक्ताच्या घरी सुरू असलेल्या लगीनघाईचा आनंदच काही और दिसत आहे.
हे पण वाचा.. कृति–धनुषची हृदयाला भिडणारी प्रेमकहाणी







