veen doghatli tutena new twist swanandi father trouble : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका वीण दोघांतली ही तुटेना (Veen Doghatli Tutena) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने कथा पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेण्याचे संकेत दिले असून प्रेक्षकांमध्ये आता पुढे काय घडणार याची उत्सुकता अधिक वाढली आहे. समर आणि स्वानंदीचे लग्न संपन्न झाल्यानंतर नात्यातील ताण कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, मल्लिकाच्या कारस्थानांचा शेवट अजून झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लग्नाच्या काळात मंदाकिनीच्या लोभाचा फायदा घेत मल्लिकाने स्वानंदीच्या आईला बांगड्या गहाण ठेवायला लावल्या. या प्रकाराची उघडकी लग्नावेळी झाल्यानंतर दोन्ही घरांना धक्का बसला आणि समरच्या मनात स्वानंदीच्या कुटुंबाबद्दल राग निर्माण झाला. त्या घटनेनंतरही मल्लिकाचा स्वानंदीच्या आयुष्यात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
नव्या प्रोमोमध्ये स्वानंदीचे बाबा तिला सांगतात की त्यांनी बँकेतून पैसे काढले असून ते समरच्या घरच्यांना परत देणार आहेत. स्वानंदी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, कारण तिला नोकरी लागल्याची ती माहिती देते. पण तिचे बाबा तिच्यावर भावनिक दबाव टाकत म्हणतात, “तुला माझी शपथ आहे.” हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे.
मात्र, या सगळ्याची खबर मल्लिकाला लागते. पैसे परत गेल्यास तिचा डाव फसणार या भीतीने ती काही गुंडांना फोन करून स्वानंदीच्या वडिलांना अडवण्याचा आदेश देते. पुढच्या दृश्यात हे गुंड स्वानंदीच्या बाबांवर हल्ला करून पैसे लुटताना दिसतात. धक्क्यात गेलेल्या त्यांच्या डोळ्यांतून असहायता आणि वेदना स्पष्ट दिसतात. ते स्वानंदीला फोनवर संपूर्ण किस्सा सांगतात आणि ते ऐकताच स्वानंदी हादरून जाते.
झी मराठीने हा प्रोमो शेअर करत एकच प्रश्न उपस्थित केला आहे—
“पैशाचं संकट स्वानंदींच्या बाबांच्या जीवावर बेतणार का?”
हे पण वाचा.. शुभ विवाह मालिकेत रागिणी पटवर्धनची जोरदार पुनरागमन एन्ट्री; अपूर्वाच्या डावाला मिळाला मोठा धक्का!
आता या घटनेनंतर स्वानंदी आपल्या वडिलांना वाचवू शकेल का, समरचा गैरसमज दूर होईल का आणि मल्लिकाचा अजून कोणता डाव मालिकेत उघड होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना पुढील भाग उत्सुकतेने पाहावे लागणार आहेत.
वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील या नवीन वळणामुळे कथा अधिक रंजक आणि भावनिक होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
हे पण वाचा.. हे लग्न थांबणार की नवं प्रकरण उभं राहणार? ‘Tarini’ मालिकेत युवराज गायब, निशिताच्या खुलाशानंतर गोंधळात भर









