ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 मध्ये दिसणार का सारिका साळुंखे? प्रोमोमुळे नावाची जोरदार चर्चा

bigg-boss-marathi 6 sarika salunkhe news : ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रोमो जाहीर होताच सोशल मीडियावर सारिका साळुंखे हिचं नाव जोरात ट्रेण्ड होत आहे. तेलुगु सिनेमात काम केलेल्या या अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक.
bigg boss marathi 6 sarika salunkhe news

bigg boss marathi 6 sarika salunkhe news : ‘बिग बॉस मराठी ६’च्या नव्या पर्वाची अधिकृत घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सलग पाच यशस्वी पर्वांनंतर हा सीझन कोणकोणत्या चर्चित व्यक्तिमत्त्वांच्या सहभागाने गाजणार, याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. कलर्स मराठीने नुकताच या पर्वाचा प्रोमो शेअर केला आणि काही क्षणांतच त्यावर प्रेक्षकांच्या कमेंट्सचा पाऊस पडू लागला. त्यात विशेष चर्चेत आलेलं नाव म्हणजे अभिनेत्री Sarika Salunkhe.

प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी “या वेळी सरिका दिसणार का?” असा अंदाज व्यक्त करत तिचं नाव कमेंटमध्ये टॅग केलं. काहींनी तर सरिकाला या शोमध्ये पाहण्याची इच्छा स्पष्ट शब्दांत मांडली. तिच्या नावाभोवती एवढी चर्चा रंगल्यामुळे ही अभिनेत्री खरंच ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये सहभागी होणार का, याबद्दल आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सरिका साळुंखे ही गेल्या काही वर्षांत झळकलेलं एक लोकप्रिय नाव आहे. मालिकांपासून ते वेब सीरिजपर्यंत, विविध माध्यमांतून तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील भूमिकेने तिला घराघरात पोहोचवले. त्यानंतर एजाज खान होस्ट करत असलेल्या ‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅलिटी शोमध्येही तिने सहभाग नोंदवत वेगळं स्थान मिळवलं.

केवळ मराठीच नाही तर तिने साऊथ इंडस्ट्रीतही पदार्पण केलं आहे. सारिका साळुंखे हिने ‘वरदराजू गोविंदम’ या तेलुगु चित्रपटातून आपली पहिली मोठी भूमिका केली. सोशल मीडियावर तिचा फॅनबेस प्रचंड असून तिच्या पोस्ट्सवर नेहमीच मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत असतात.

हे पण वाचा.. पारू मालिकेत पारु-अहिल्या आमनेसामने अन् किर्लोस्कर घरात नवे वादळ!

यामुळेच ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात ती दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तिचा सहभाग निश्चित झाला तर तो शोसाठी मोठा आकर्षणबिंदू ठरू शकतो. सध्या मात्र चॅनलकडून अधिकृत घोषणा न झाल्याने सर्वजण फक्त अंदाज बांधत आहेत. आगामी दिवसांत हा तर्क खरा ठरणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

हे पण वाचा.. कप बशी’चे शूट संपले… अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली..

bigg boss marathi 6 sarika salunkhe news