ADVERTISEMENT

लक्ष्मी निवास फेम कलाकारांचा ‘जिवलग जीवाचा’ वर धमाकेदार डान्स; संतोषमामावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

lakshmi niwas actors dance video comments : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील काही कलाकारांचा मजेशीर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; संतोषमामाच्या स्टाईलवर नेटकरी फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत.
lakshmi niwas actors dance video

lakshmi niwas actors dance video : ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. या मालिकेत दाखवले जाणारे घरगुती नातेसंबंध, प्रत्येक पात्राचा वेगळा स्वभाव आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणारे छोटे–मोठे प्रसंग यामुळे ही कथा प्रेक्षकांच्या जवळची वाटते. विविध कुटुंबातील रंगीबेरंगी पात्रांमुळे ‘लक्ष्मी निवास’ ला मिळणारा प्रतिसाद कायमच उत्साहवर्धक राहिला आहे.

अशातच, मालिकेतील काही कलाकारांचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वीणा, हरीश, नीलांबरी, आनंदीची आत्या आणि मालिकेतील सर्वात चर्चेत असलेला संतोषमामा एका खास गाण्यावर धमाल करताना दिसतात. ‘जिवलग जीवाचा संतोष मामा…’ या गाण्यावर हे सर्व कलाकार मस्त मजेत डान्स करत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि खेळकर वृत्तीमुळे व्हिडीओ अधिकच आकर्षक वाटतो.

व्हिडीओमध्ये वीणाचा कूल लूक, संतोषमामाची टोपी आणि गॉगल यामुळे फॅन्सनी त्यांच्यासाठी वेगळीच मजेशीर कमेंट्सची बरसात केली आहे. झी मराठीनेही “जिवलग नसला तरी आपल्या संतोषमामाचं आगमन स्टेजवर झालेलं आहे” असे मजेदार कॅप्शन देत हा क्लिप शेअर केला.

प्रेक्षकांनी या व्हिडीओवर दिलेल्या प्रतिक्रिया अगदी भन्नाट आहेत. कोणीतरी लिहिले, “खूप सुंदर व्हिडीओ!”, तर आणखी एकाने मजेत लिहिले, “हा संतोषमामा जिवलग नाही, खूप खडूस आहे.” काही जणांनी त्याला “कंजूष” म्हटले, तर काहींनी “हलकट” म्हणत विनोद केला. “संतोषशेठ कमाल आहेत” असे कौतुक करणारेही अनेक कमेंट्स दिसल्या. काहींनी तर “हा कोणाचाच नाही” असे म्हणत जोक केला. हसण्याच्या इमोजींच्या रांगांनी कमेंट सेक्शन भरून गेल्याने या व्हिडीओची लोकप्रियता स्पष्ट होते.

हे पण वाचा.. ओट्सपासून फळांपर्यंत… ‘कमळी’ फेम विजया बाबरचा साधा पण पौष्टिक डाएट प्लॅन चर्चेत

मालिकेत सध्या विविध ट्विस्ट–टर्न्स सुरू असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर दिसणारे कलाकारांचे असे हलके–फुलके क्षण मात्र चाहत्यांना मालिकेतील तणावापासून थोडा दिलासा देतात. ‘लक्ष्मी निवास’ मधील हा डान्स व्हिडीओ सध्या फॅन्ससाठी भन्नाट एंटरटेनमेंट ठरत आहे.

हे पण वाचा.. लग्नाला १२ वर्षं, तीनदा गर्भपाताचा वेदनादायी संघर्ष… अखेर आई झाल्यावर अभिनेत्री नेहा मर्दा म्हणाली

lakshmi niwas actors dance video