mukta barve bhaigiri ata hovude dhingana promo : स्टार प्रवाहवरील प्रेक्षकप्रिय शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात नेहमीच विविध मालिकांचे कलाकार एकत्र येतात, मजेशीर टास्क खेळतात आणि स्टुडिओभर हास्याची बरसात करतात. सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव आपल्या खास अंदाजात या कलाकारांकडून वेगवेगळे गेम खेळून घेतो आणि त्यामुळे हा संपूर्ण शो प्रेक्षकांसाठी एक धमाल अनुभव ठरतो.
याच कार्यक्रमाचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर झळकला आणि त्यात लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ने केलेली एन्ट्री जबरदस्त व्हायरल झाली आहे. मंचावर ती येताच वातावरणच बदलल्यासारखे वाटते. विशेष म्हणजे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि अर्जुन यानीही या भागात हजेरी लावली असून तिघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.
प्रोमोमध्ये सिद्धार्थ जाधव मजेत म्हणतो, “आज मुक्ता बर्वे तुम्हाला भाईगिरी शिकवणार!” आणि यानंतर सुरू होतो धमाल सत्र. स्टेजवर मोठ्या स्क्रीनवर ‘मुक्ताभायची शाळा’ असा मजकूर दिसतो. मुक्ता बर्वे सायली आणि अर्जुनला गुंडासारखा वॉक कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवते. तिचा आवाज, तिची स्टाईल आणि तिचा खास अंदाज पाहून प्रेक्षकही खळखळून हसतात.
यानंतर ती दोघांना तसाच वॉक करून दाखवायला सांगते. अर्जुन आणि सायली प्रयत्न करतात, पण मुक्ता बर्वेच्या नजरेत ते अजिबात बसत नाही. ती पुन्हा एकदा स्वतः चालून दाखवते आणि म्हणते, “भाईचा वॉक असा असायला हवा!” या विनोदी पद्धतीने केलेला भाईवॉकचा क्लास प्रेक्षकांना खूप भावतो.
इथेच न थांबता मुक्ता बर्वे सायलीला फोनवरून खंडणी मागण्याचे अभिनय करायला सांगते. सायलीची निरागस शैली पाहून मुक्ता मिश्किलपणे म्हणते, “अगं पाणीपुरीवाल्याला जास्तीची पुरी मागितल्यासारखं का विचारतेस?” हा डायलॉग ऐकताच मंचावर हशा पिकतो.
शेवटी प्रोमोमध्ये मुक्ता बर्वे सायली आणि अर्जुन दोघांनाही प्रेमाने जवळ घेताना दिसते. या सीनने चाहत्यांची मनं अगदी जिंकली आहेत.
हे पण वाचा.. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा बदल? ईशा केसकर मालिका सोडणार नव्या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चर्चा
स्टार प्रवाहने प्रोमो शेअर करताना “धिंगाणाच्या मंचावर सुरू होणार मुक्ताभायची शाळा!” असे कॅप्शन दिले असून चाहत्यांमध्ये या भागाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
दरम्यान, मुक्ता बर्वे लवकरच प्रिया बापट आणि सचित पाटीलसोबत ‘असंभव’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या चाहत्यांसाठी हा प्रोमो एक वेगळीच मेजवानी ठरली आहे.
हे पण वाचा.. TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ची दमदार चमक! तेजश्री प्रधानची मालिका अव्वल दावेदारांमध्ये









