स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Laxmichya Pawalani पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 21 नोव्हेंबरपासून प्रसारित होणाऱ्या भागांमध्ये कथानक मोठ्या वळणावर पोहोचणार असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट झालं असून, चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमही वाढला आहे. मालिकेतील प्रमुख पात्र कला आणि अद्वैतच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कथेप्रमाणे कला राहुल आणि रोहिणीच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश करण्यासाठी निघते, मात्र त्याच वेळी तिचा गंभीर अपघात होतो. कला-अद्वैतने एकमेकांच्या संमतीने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याआधीच घडलेली ही दुर्घटना मालिकेला वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. या अपघाताच्या क्षणीच सुकन्या नावाचं नवं पात्र कथेत दाखल होतं. अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर साकारणारी ही नवी व्यक्तिरेखा नेमकी कोण आहे, तिचा चांदेकर कुटुंबाशी असलेला संबंध काय, आणि ती कलाचा जीव का वाचवते—या प्रश्नांनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अद्वैतची आई सरोज चांदेकरची भूमिका साकारणाऱ्या पल्लवी पटवर्धनने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ही चर्चा अधिक रंगू लागली. सरोज या व्हिडिओत सांगते की, Laxmichya Pawalani मालिकेत आता एक नवा अध्याय सुरू होत असून, नवीन चेहरा कुटुंबाचा भाग बनत आहे. तिच्या या वक्तव्यामुळे ईशा केसकरच्या एक्झिटबाबतच्या चर्चांना अधिकच हवा मिळाली.
मालिकेत याआधीही काही कलाकारांची एन्ट्री-एक्झिट झाली असली, तरी सुकन्याच्या आगमनाचं प्रमोशन मात्र विशेष पद्धतीने होत आहे. नुकतेच जाहीर झालेल्या BTS व्हिडिओज आणि प्रोमोपासून असे संकेत मिळत आहेत की, सुकन्या अद्वैतच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. काही प्रेक्षकांनी तर असा अंदाज वर्तवला आहे की, कला मृत्यूपूर्वी सुकन्याला हृदयदान करेल आणि त्यानंतर सुकन्याच नवीन नायिका म्हणून पुढे येईल.
तरीही वाहिनी, निर्माते किंवा कलाकारांकडून ईशा केसकरच्या एक्झिटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चाहत्यांना मात्र आगामी भागांमधून या सर्व चर्चांना उत्तर मिळण्याची उत्सुकता आहे. Laxmichya Pawalani मालिकेतील हा ट्विस्ट नेमका कोणत्या दिशेने नेईल, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
घराला आग लागली तेव्हा थोडक्यात बचावला शिव ठाकरे, काय घडलं सांगत म्हणाला..








