ADVERTISEMENT

इंडस्ट्रीत वाढत्या घटस्फोटांवर संग्राम समेळचं थेट मत; ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ नाटकातून मांडला वास्तवाचा आरसा

divorce rise sangram samel opinion : संग्राम समेळ यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या घटस्फोटांवर स्पष्ट मत व्यक्त करत सांगितलं की, नातेसंबंध टिकवण्यासाठी ‘मी’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं आहे. ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ या नाटकातूनही त्यांनी हेच वास्तव रंगमंचावर आणलं आहे.
divorce rise sangram samel opinion

divorce rise sangram samel opinion : मनोरंजन क्षेत्रातील नातेसंबंध नेहमीच चर्चेत राहतात. अनेकदा चर्चित कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येतात आणि त्यानंतर त्या जोडप्यांमागील वैयक्तिक संघर्ष, दडपणं आणि तडजोडी यावर पुन्हा चर्चा सुरू होते. याच पार्श्वभूमीवर सध्या रंगभूमीवर आलेलं ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे नाटक प्रेक्षकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. या नाटकात Sangram Samel, राजन ताम्हाणे आणि अदिती देशपांडे प्रमुख भूमिकांत दिसत असून, नात्यातील गुंतागुंत संवेदनशीलपणे मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे.

या नाटकाच्या प्रचारादरम्यान तिघांनीही ‘कलाकट्टा’शी बोलताना त्यांच्या अनुभवांबाबत आणि समाजात वाढत चाललेल्या घटस्फोटाच्या प्रमाणाबाबत आपली मतं मांडली. राजन ताम्हाणे यांनी सांगितलं की, आजची तरुण पिढी नात्यांकडे पाहण्याची दृष्टिकोनातून बदललेली आहे. त्यामुळे हे नाटक त्यांना विचार करायला भाग पाडेल, याची त्यांना खात्री आहे.

यानंतर Sangram Samel यांनी अधिक स्पष्ट भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, नातेसंबंध टिकवायचे असतील तर ‘स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगणं’ आवश्यक आहे. सतत ‘मी आणि माझं’ असा विचार करणाऱ्या लोकांनी लग्नासारख्या जबाबदारीच्या निर्णयापासून दूर राहावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. लग्न म्हणजे त्याग, संयम आणि परस्परांचा विचार—हे विसरल्यामुळे अनेक नाती तुटताना दिसतात, असंही ते म्हणाले. नाटकातही एका नात्यानं दुसऱ्या नात्यासाठी केलेला त्याग आणि त्यामुळे उभं राहिलेलं सुंदर कुटुंब दाखवलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

अदिती देशपांडे यांनीही नात्यातील तडजोडींबाबत मनमोकळं बोलताना सांगितलं की, परिपूर्ण माणूस कोणीच नसतो. कधी स्त्री एक पाऊल मागे घेते, तर कधी पुरुषाला पुढे यावं लागतं. आज मात्र सर्व काही ‘इन्स्टंट’ मिळावं अशी प्रवृत्ती वाढते आहे. नात्यात अडचणी आल्या की त्यांना वेळ न देता थेट वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो, हीच खंत त्यांनी व्यक्त केली.

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण जास्त असल्याचं अनेकदा म्हटलं जातं. पण याबाबत Sangram Samel यांनी सांगितलं की, “घटस्फोट सर्वत्र होतात; परंतु आपली इंडस्ट्री प्रकाशझोतात असल्यामुळे या घटना जास्त चर्चेत येतात. प्रत्यक्षात कॉर्पोरेट क्षेत्रातही घटस्फोटाचं प्रमाण मोठं आहे, फक्त ते एवढं मीडियात झळकत नाही.”

हे पण वाचा.. सुरभी भावेचा मालेगाव प्रकरणावर संताप; म्हणाली, “अशी कृत्यं करणाऱ्यांना त्वरित शिक्षा झालीच पाहिजे

नातेसंबंध, त्यातील चढउतार आणि बदलती पिढी यांचं वास्तव उलगडणारं ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे नाटक सध्या चर्चेत आहे. कलाकारांच्या या स्पष्ट मतांमुळे नातेसंबंधांबद्दलची सामाजिक चर्चा पुन्हा एकदा तेजीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे पण वाचा.. अश्विनी महांगडे ने शेअर केला जुन्या आठवणींचा खास व्हिडिओ; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील मेकअप रूम पुन्हा झाली जिवंत