ADVERTISEMENT

आली शुभपुर्वसंध्या! ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव च्या हळदीचा जल्लोष; भावाने शेअर केला खास व्हिडीओ

meghan jadhav haldi ceremony wedding video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव लग्नबंधनात अडकण्याच्या मार्गावर असून, त्याच्या हळदी समारंभाचा आनंददायी व्हिडीओ सख्ख्या भावाने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
meghan jadhav haldi ceremony wedding video

meghan jadhav haldi ceremony wedding video : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव (Meghan Jadhav)सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात खास टप्प्याचा आनंद लुटत आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या मेघनच्या लग्नाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोरात सुरू होत्या. अखेर या चर्चांना मुहूर्त मिळाला असून १६ नोव्हेंबर रोजी त्याचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी शनिवारी रात्री मेघनच्या घरी हळदीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या खास समारंभाची झलक स्वतः मेघनचा सख्खा भाऊ, अभिनेता मंदार जाधवने सोशल मीडियावर शेअर केली. ‘मेघनची हळद…’ असा प्रेमळ कॅप्शन देत त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये जाधव कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद, घरातला उत्साह आणि मेघनच्या चेहऱ्यावरचे लग्नसोहळ्याचे तेज स्पष्टपणे दिसत होतं. मेघनच्या कपाळावर बांधलेली मुंडावळही चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत होती.

लग्नाच्या मुहूर्तापूर्वी मेघन आणि त्याची होणारी पत्नी अनुष्का पिंपुटकर यांच्या अनेक विधींना चाहत्यांचं मोठं प्रतिसाद मिळत आहे. दोघांची ओळख ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या सेटवर झाली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी निवास’ टीमने या जोडीसाठी खास केळवण आयोजित केली होती, तर अनुष्काच्या मेहंदी सोहळ्याला अभिनेत्री हर्षदा खानविलकरही हजर होती. त्यानंतर आता मेघनच्या हळदीने लग्नसोहळ्याची रंगत अधिकच वाढवली आहे.

मंदार जाधव सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुटुंबातील प्रेम, नाती आणि लग्नसोहळ्याचा आनंद दर्शवणारा हा व्हिडिओ पाहताच अनेक चाहत्यांनीही शुभेच्छांचा ओघ सुरू केला.

हे पण वाचा.. एकाच दिवशी पाच लूक्स! ‘लपंडाव’ मालिकेसाठी रुपाली भोसलेची अफाट धडपड; मेकअप रूममधील व्हिडीओने वाढवलं कौतुक

सध्या ‘लक्ष्मी निवास’मध्ये जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत झळकणारी अनुष्का यांचा लग्नसोहळा नेमका कसा असेल, कोणकोणते कलाकार उपस्थित राहतील याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात ही सुंदर जोडी नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे.

हे पण वाचा.. झी मराठी’वर ‘कमळी-तारिणी’चा महासंगम; विजया बाबर म्हणाली– “हा अनुभव माझ्यासाठी खास होता

meghan jadhav haldi ceremony wedding video