amruta fadnavis chief minister question answer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या कामामुळे आणि विनयशील स्वभावामुळे त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस या फक्त बँकर नाहीत तर एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांच्या आवाजातील गाणी अनेकांना आवडली असून त्यांनी संगीत क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे.
अमृता फडणवीस नुकत्याच ‘द कर्ली टेल्स’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित अनेक रोचक गोष्टींवर मोकळेपणाने संवाद साधला.
मुलाखतीदरम्यान त्यांना एक वेगळा आणि थोडासा गंमतीशीर प्रश्न विचारण्यात आला – “जर तुम्हाला एक दिवस मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली, म्हणजेच देवेंद्र फडणवीसांसोबत लाइफ स्वॅप करायची वेळ आली, तर तुम्ही काय कराल?” या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर अगदीच साधं, पण मन जिंकणारं होतं.
त्या हसत म्हणाल्या, “देवेंद्रजींनी इतकं काम केलं आहे की मला फारसं काही करण्यास उरलेलं नाही. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं आहे. भ्रष्टाचारावरही त्यांनी कठोर नियंत्रण आणलं आहे. आज लोक भ्रष्टाचार करायला घाबरतात, कारण त्यांना खात्री आहे की देवेंद्रजींच्या काळात अशा गोष्टी लपून राहत नाहीत.”
त्या पुढे म्हणाल्या, “पण जर मी खरोखरच एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले, तर मी सुट्टी घेईन आणि माझ्या पती आणि मुलीसोबत छान वेळ घालवण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाईन. इतकं काम केल्यानंतर विश्रांतीही गरजेचीच आहे ना!”
हे पण वाचा.. लग्नाच्या अडीच वर्षांनी अभिनेत्री अमृता पवार बनली आई; लेकाच्या बारशात केला नावाचा सुंदर खुलासा!
अमृता फडणवीस यांचं हे उत्तर जितकं साधं तितकंच मनाला भिडणारं आहे. त्यांच्या बोलण्यातून केवळ विनोदबुद्धीच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांविषयी असलेला आदर आणि आत्मीयता स्पष्टपणे जाणवते. या उत्तराने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्या केवळ एका राजकीय व्यक्तीच्या पत्नी नाहीत, तर स्वतःच्या ओळखीनं उजळलेलं व्यक्तिमत्व आहेत.
हे पण वाचा.. तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामी समर्थांबाबतचा अविस्मरणीय अनुभव









