Bhau Kadam Chala Hawa Yeu Dya story and meeting with Shah Rukh Khan : मराठी मनोरंजनविश्वातील एक घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे भाऊ कदम (Bhau Kadam). त्यांच्या भन्नाट अभिनयाने आणि नैसर्गिक विनोदबुद्धीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमामुळे भाऊ कदम यांची ओळख अधिक ठळक झाली. या शोमधील विविध भूमिका आणि संवादांमुळे त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रवासाबद्दल आणि त्या मागच्या गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. त्यांनी सांगितलं की या शोमध्ये त्यांची वर्णी लागण्यामागे निलेश साबळे यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीला ते ‘फू बाई फू’ हा शो करायच्या विचारात नव्हते. तीन सीझनसाठी त्यांनी नकारही दिला होता. पण त्यांच्या पत्नी आणि मुलीने आग्रह धरल्यामुळे त्यांनी अखेर तो शो स्वीकारला. “लोक ओळखतील म्हणून काहीतरी करावं असं माझं कधीच वाटलं नव्हतं,” असं ते हसत म्हणाले.
भाऊ कदम पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात त्यांना विनोद सादर करताना अडचणी येत होत्या, पण दिग्दर्शक राकेश सारंग आणि ज्येष्ठ कलाकार सतीश तारे यांनी त्यांना खूप आधार दिला. “साबळे त्या काळात सूत्रसंचालक होता. तिथूनच आमचं ट्युनिंग जमलं आणि मग आम्ही ‘चला हवा येऊ द्या’चा प्रवास सुरू केला,” असं त्यांनी नमूद केलं.
शाहरुख खानसोबतच्या भेटीबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाले, “साबळेने मला शाहरुखचा अभिनय करायला सांगितलं. मी तो केला आणि जेव्हा शाहरुख माझ्या समोर आला, तेव्हा तो स्वतः मला बघून म्हणाला – ‘असा शाहरुख मी सुद्धा पाहिला नाही!’ त्या क्षणी सगळ्या टीमचं कौतुक झालं. माझ्याकडून अनेक भूमिका करून घेतल्या, आणि प्रेक्षकांनी ते मनापासून स्वीकारलं.
हे पण वाचा.. ते पाहून वडील फक्त रडत होते…” भाऊ कदम यांनी सांगितला हृदयस्पर्शी किस्सा, म्हणाले – आज ते असते तर…
भाऊ कदम यांच्या या अनुभवांनी एक गोष्ट स्पष्ट होते — मेहनत आणि टीमवर्क यांचं संयोजन असेल तर यश नक्की मिळतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या यशामागे निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं अनोखं समीकरण आजही प्रेक्षकांना आठवतं.
हे पण वाचा वाचा.. सोहम बांदेकरच्या लग्नाचा जल्लोष सुरू! ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांसह पार पडलं पहिलं केळवण, पारंपरिक जेवणाची खास मजा









