ADVERTISEMENT

अधिरासारखी…’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरे बोलला खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल म्हणाला.

Veen Doghantali Hi Tutena Raj More expectations about his wife : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेता राज मोरे सध्या चर्चेत आहे. ऑनस्क्रीन रोहन म्हणून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या राजने आता खऱ्या आयुष्यात कशी जोडीदार हवी आहे हे स्पष्ट सांगितलं आहे.
Veen Doghantali Hi Tutena Raj More expectations about his wife

Veen Doghantali Hi Tutena Raj More expectations about his wife : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत सध्या रोहन आणि अधिराच्या लग्नाचा ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या मालिकेतील ‘रोहन’ची भूमिका साकारणारा अभिनेता राज मोरे (Raj More) आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

राज मोरेने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. ‘अल्ट्रा मराठी’शी संवाद साधताना राजने सांगितलं की, मालिकेतल्या रोहनच्या जशा अटी आहेत, तशा त्याच्या खऱ्या आयुष्यात नाहीत, पण काही अपेक्षा मात्र आहेत. तो म्हणाला, “माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल मी फारशा अटी ठेवल्या नाहीत, पण ती मनाने चांगली असावी, खरी आणि प्रामाणिक असावी. प्रेमाच्या बाबतीत ती व्यक्त होणारी असावी.”

त्याने पुढे अधिराच्या व्यक्तिरेखेचा संदर्भ घेत म्हटलं, “अधिरा जशी जीवापाड प्रेम करणारी आहे, तसं प्रेम मला आवडतं. पण तिच्यासारखी स्वतःला त्रास देणारी, नस कापून घेणारी नको. एवढं अति प्रेम नको. मला फक्त अशी पत्नी हवी आहे जी भावनिकदृष्ट्या स्थिर आणि मनाने सुंदर असेल.”

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून राज मोरे प्रेक्षकांच्या ओळखीला आला होता. त्या मालिकेतल्या त्याच्या भूमिकेने त्याला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली. आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’मुळे त्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

मालिकेच्या गोवा शूटिंगदरम्यानच्या आठवणींवर बोलताना राज म्हणाला, “शूटिंगदरम्यान खूप ऊन होतं, पण सगळ्यांनी मिळून काम केलं. अधिरा म्हणजेच पूर्णिमा डे आणि संपूर्ण टीमसोबत मजा आली. आम्ही मासे खाल्ले, सगळ्यांना मासे खायला आवडतात. वातावरण इतकं आनंदी होतं की कामही मजेशीर वाटलं.”

हे पण वाचा.. खुशबू तावडेने दाखवली सासरची झलक; कोल्हापुरातील घर, गोठा आणि मिसळचा व्ह्लॉग चाहत्यांच्या पसंतीस

सध्या राज मोरे आणि पूर्णिमा डे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता आणि रिअल फीलमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष ठरत आहे. अशातच राजने दिलेलं हे candid उत्तर त्याच्या चाहत्यांसाठी एक वेगळीच झलक ठरत आहे — एका कलाकाराचा प्रेमाविषयीचा प्रामाणिक दृष्टिकोन दाखवणारी.

हे पण वाचा.. मिलिंद गवळींची सुबोध भावेबद्दल खास पोस्ट; म्हणाले, “मला आयुष्यात कधीच जमलं नाही ते सुबोधनं सहज केलं!”

Veen Doghantali Hi Tutena Raj More expectations about his wife