khushboo tawade kolhapur home glimpse : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री खुशबू तावडे (Khushboo Tawade) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण यावेळी तिने अभिनयामुळे नव्हे, तर तिच्या खास कौटुंबिक व्हिडीओमुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. खुशबूने नुकताच तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्ह्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच पती संग्राम साळवीच्या कोल्हापुरातील घराची झलक दाखवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
खुशबू आणि संग्राम हे दोघेही अभिनय क्षेत्रातील परिचित चेहरे आहेत. मात्र, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलक फारशी पाहायला मिळत नाही. त्यामुळेच खुशबूने शेअर केलेला हा व्ह्लॉग अनेकांसाठी खास ठरला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच ती कोल्हापुरात पोहोचलेली दिसते आणि आपल्या सासरच्या घरातील वातावरणाची झलक दाखवते.
व्हिडीओत तिने घराच्या आवारातील म्हशींचा गोठा दाखवला आहे. ग्रामीण आणि पारंपरिक वातावरणाने नटलेलं हे घर पाहून प्रेक्षकही भारावून गेले आहेत. घरातील भिंतीवर संग्राम साळवीचा एक मोठा फोटो असल्याचं दिसतं. त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी खुशबूने खास कोल्हापुरी मिसळवर ताव मारताना दाखवलं आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि गावातील लोकांशी असलेला आत्मीयतेचा भाव प्रेक्षकांनाही भावतो.
याशिवाय खुशबूने या व्हिडीओत अंबाबाई मंदिर आणि बाळूमामाच्या मंदिराचेही दर्शन घडवले आहे. ती, संग्राम आणि त्यांच्या दोन मुलांसह मंदिरात दर्शन घेताना दिसतात. दर्शनाच्या वेळी गावातील अनेक लोकांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले असून त्या क्षणांचंही दर्शन तिने आपल्या व्ह्लॉगमध्ये घडवलं आहे.
हे पण वाचा.. मिलिंद गवळींची सुबोध भावेबद्दल खास पोस्ट; म्हणाले, “मला आयुष्यात कधीच जमलं नाही ते सुबोधनं सहज केलं!”
खुशबू तावडे सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असते. तिचा हा कोल्हापूर दौरा चाहत्यांना तिच्या आयुष्याचा आपुलकीने जवळचा भाग दाखवतो. सध्या ती कोणत्याही नवीन मालिकेत दिसत नसली तरी, या व्ह्लॉगमधून तिचा साधा, नैसर्गिक आणि कौटुंबिक अवतार चाहत्यांच्या मनाला भिडला आहे. पुढे ती कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. त्या जयंतने तुझी…” जान्हवी जिवंत असल्याचं सत्य लक्ष्मी समोर येणार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट!







