ADVERTISEMENT

लग्नाचा विचार आहे का नाही? ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचं मजेशीर उत्तर चर्चेत!

gauri kulkarni funny reply about marriage : अभिनेत्री गौरी कुलकर्णीनं चाहत्याच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाला दिलेलं विनोदी उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचं केंद्र ठरतंय. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
gauri kulkarni funny reply about marriage

gauri kulkarni funny reply about marriage : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. कारण तिच्या एका चाहत्याने विचारलेल्या साध्या पण उत्सुकता निर्माण करणाऱ्या प्रश्नाला दिलेलं तिचं मजेशीर उत्तर. “लग्नाचा काही विचार आहे का नाही?” असा प्रश्न जेव्हा एका चाहत्याने तिला विचारला, तेव्हा गौरीनं दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हसले.

गौरी कुलकर्णी ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. मालिकेत तिने यशची गर्लफ्रेंड साकारत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेतून ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकली. अभिनयासोबतच गौरी सोशल मीडियावरही सक्रिय असून, ती नेहमी तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

अलीकडेच गौरीनं इन्स्टाग्रामवर “Ask Me Anything” सेग्मेंट घेतला होता. यात एका चाहत्याने तिला थेट विचारलं, “लग्नाचा काही विचार आहे का नाही?” या प्रश्नावर गौरीनं स्मितहास्य करत उत्तर दिलं – “आहे पण आणि नाही पण!” तिचं हे उत्तर ऐकून चाहत्यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं. तिच्या या उत्तरातून तिचा हलका, विनोदी आणि मोकळा स्वभाव स्पष्ट दिसून आला.

याच संवादादरम्यान आणखी एका चाहत्याने तिला विचारलं की, “टीव्हीवर पुन्हा कधी दिसणार?” यावर गौरीनं मनमोकळं उत्तर दिलं, “टीव्हीवर पुन्हा काम करायला मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे.” यावरून तिचं अभिनयावरील प्रेम आणि प्रामाणिकपणा स्पष्ट जाणवतो.

तसंच एका चाहत्याने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यावर गौरी कुलकर्णीने तिच्या खास मजेशीर अंदाजात उत्तर दिलं, “मी दिवसातून १२ तास झोपते, त्यामुळे तिकडे गेले तर ते म्हणतील – ही घरीच झोपते!” या विनोदी उत्तराने सर्वांनाच हसू आलं.

हे पण वाचा..  गोविंदाच्या गाण्यावर माधवी निमकरचा झकास ठुमका; नेटकरी म्हणाले, “हे तर भन्नाटच!”

गौरी कुलकर्णीच्या या संवादातून तिचा नैसर्गिक आणि खुला स्वभाव पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळाला. तिचं साधं, सरळ पण मजेशीर बोलणं हेच तिच्या लोकप्रियतेचं गमक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर तिची ही उत्तरे सध्या व्हायरल होत असून, पुन्हा एकदा गौरी कुलकर्णी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

हे पण वाचा.. अखेर सर्वांसमोर सूरज चव्हाणच्या पत्नीचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी थाटात पार पडलं सूरजचं केळवण

gauri kulkarni funny reply about marriage