ADVERTISEMENT

अखेर सर्वांसमोर सूरज चव्हाणच्या पत्नीचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी थाटात पार पडलं सूरजचं केळवण

suraj chavan wife face reveal at ankita walawalkar home : बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण अखेर आपल्या होणाऱ्या पत्नीला सर्वांसमोर आणला आहे. अंकिता वालावलकरच्या घरी थाटात पार पडलेल्या केळवण समारंभात सूरज आणि संजनाची जोडी विशेष झळकली.
suraj chavan wife face reveal at ankita walawalkar home

suraj chavan wife face reveal at ankita walawalkar home : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचं लग्न. काही दिवसांपूर्वीच सूरजने आपल्या लग्नाची घोषणा सोशल मीडियावर करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. “सूरज चव्हाणची बायको कोण?” हा प्रश्न अनेकांच्या मनात फिरत होता. आणि अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

अंकिता वालावलकरच्या घरी झालेल्या केळवण समारंभात सूरजने आपल्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा सर्वांसमोर आणला. या खास प्रसंगी सूरजची पत्नी संजना सोबत होती आणि दोघांची जोडी पाहून चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला. अंकिताने आपल्या घरात केळवणासाठी विशेष तयारी केली होती — फुलांची सजावट, पारंपरिक पुरी-भाजीचा बेत आणि भावंडांच्या स्नेहाने भारलेला वातावरण यामुळे कार्यक्रम अधिक सुंदर झाला.

या प्रसंगी सूरज चव्हाणने होणाऱ्या पत्नी संजनासाठी खास उखाणा घेतला — “बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न, संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!” त्यानंतर संजनानेही प्रेमळ अंदाजात उत्तर दिलं, “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!” या संवादावर उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.

अंकिता वालावलकरने दोघांचं औक्षण करत त्यांना भेटवस्तू दिल्या आणि सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं — “सूरज आणि संजना… सूरजचं केळवण.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी कमेंट्समध्ये “लग्न कधी आहे?” असा प्रश्न विचारत सूरजच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा.. प्रेमाची नवी चाहूल! अर्णवच्या भावना ऐकून ईश्वरीच्या मनात उमललं प्रेम – तू ही रे माझा मितवा मालिकेत रोमँटिक ट्विस्ट

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सुरू झालेलं सूरज आणि अंकिताचं भावंडासारखं नातं आजही तसंच टिकून आहे. शो संपल्यानंतरही त्यांनी हे आपुलकीचं बंध कायम ठेवलं आहे. आता सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहणारे चाहते त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हे पण वाचा.. हा पुढचा प्रश्नच नाही!” लग्नाबद्दल विचारताच तेजश्री प्रधानची मजेशीर प्रतिक्रिया; डेस्टिनेशन वेडिंगवरही व्यक्त केलं मत

suraj chavan wife face reveal at ankita walawalkar home