ADVERTISEMENT

लक्ष्मी निवास मध्ये भावनिक ट्विस्ट; जान्हवी-भावना समोरासमोर येणार? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

lakshmi niwas janhvi bhavana meet twist marathi show update : लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी जिवंत असल्याचा धक्का अजून प्रेक्षकांच्या मनातून गेला नाही. आता तिची भावना समोर ओळख पटणार का? नवीन प्रोमोमुळे उत्कंठा वाढली आहे.
lakshmi niwas janhvi bhavana meet twist marathi show update

lakshmi niwas janhvi bhavana meet twist marathi show update : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास (Lakshmi Niwas) सध्या नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. काही दिवसांपासून मालिकेतील जान्हवीच्या कथानकाने भावनिक वळण घेतले असून, तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंगांमुळे मालिकेची टीआरपी झपाट्याने वधारताना दिसत आहे. जयंतच्या अत्याचारांना कंटाळून त्याचा सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतलेल्या जान्हवीने गोव्यातील समुद्रात उडी मारल्याचा प्रसंग प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्या घटनेनंतर जान्हवीचा मृत्यू झाल्याची बातमी तिच्या कुटुंबात पसरली आणि संपूर्ण घर शोकात बुडालं.

मात्र नियतीने वेगळाच खेळ रचला होता. समुद्रकिनारी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या जान्हवीची भेट विश्वाच्या वडिलांशी झाली. त्यांनी तिला घरी नेले आणि तिची देखभाल सुरू केली. सुरक्षेच्या भीतीने आणि पुन्हा जयंतच्या तावडीत सापडू नये म्हणून जान्हवीने आपली खरी ओळख लपवली आणि स्वत:चे नाव ‘तनुजा’ असे सांगून ती आता विश्वाच्या घरात राहते आहे.

दरम्यान, लक्ष्मी निवास च्या नव्या प्रोमोने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. या प्रोमोमध्ये भावना विश्वाच्या घरी येताना दिसते आणि त्याच वेळी जान्हवी तिच्या नजरेस पडते. भावना तिच्याकडे हसून पाहते, तर दुसरीकडे जान्हवीचा गळा दाटून येतो. ती शांतपणे भावनाच्या मागे जाते, हातातील रुमाल खाली टाकते आणि तो उचलण्याच्या निमित्ताने भावनाच्या पाया स्पर्श करते. भावना याची जाणीव होते पण मागे वळून पाहते तेव्हा तिला कोणीही दिसत नाही. या दृश्याने प्रेक्षकांच्या भावना उचंबळून आल्या आहेत.

सोबतच व्येंकीला झालेल्या अटकेच्या कथानकामुळेही मालिकेत नवीन रंग भरले आहेत. सिद्धू आणि भावना त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणते पाऊल उचलेल? श्रीनिवास आणि लक्ष्मीला हे सत्य कधी कळणार? या सर्व घडामोडींची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

हे पण वाचा.. समर-स्वानंदीचं केळवण जल्लोषात! वीण दोघातली ही तुटेना मालिकेतील लग्नसोहळ्याला सुरुवात..

लक्ष्मी निवास मध्ये पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना आता आतुरता लागली आहे. नियती जान्हवी-भावनाची खरी भेट घडवून आणणार का, हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. प्रेक्षक मात्र पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा.. लाडक्या दादूसचा खास क्षण! अरुण कदम यांनी घरच्यांसोबत साजरा केला ६० वा वाढदिवस; नातवाच्या अनोख्या गिफ्टने भारावले

lakshmi niwas janhvi bhavana meet twist marathi show update