mahhi vij slams fake reports : गेल्या काही दिवसांपासून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे माही विज (Mahhi Vij) आणि जय भानुशाली (Jay Bhanushali). त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क रंगताना दिसत होते. काही पोस्टमध्ये तर या दाम्पत्याने घटस्फोटाची कागदपत्रे साइन केल्याचा दावा करण्यात आला. अखेर या चर्चेला ब्रेक देत माही विज स्वतः पुढे आली आणि तिच्या खास शैलीत या सर्व बातम्यांना उत्तर दिले.
तिने तिच्या यूट्यूब चॅनेलवरून व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, “प्रत्येक गोष्ट बोलण्याची वेळ येते, आणि आज तशी वेळ आली. लोक फक्त चर्चेसाठी आणि लाइक्ससाठी काहीही लिहितात. कुठेतरी वाचलं की मी कागदपत्रं साइन केलीत… तर मग ती दाखवा.” तिच्या या प्रतिक्रियेवरूनच हे स्पष्ट झाले की माही विज या अफवांबद्दल स्पष्ट आणि धाडसी भूमिका घेत आहे.
तिने पुढे सांगितले की, जोपर्यंत ती स्वतः काही सांगत नाही, तोपर्यंत कुणालाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निष्कर्ष काढण्याचा अधिकार नाही. या सर्व चर्चेमुळे तिच्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचे तिने भावनिक शब्दांत सांगितले. व्हिडीओमध्ये तिच्या मुलीने अफवांबद्दल विचारलेल्या मेसेजचाही तिने उल्लेख केला, ज्यामुळे आई म्हणून तिची चिंता अधिक प्रकर्षाने जाणवली.
गैरसमजांना पूर्णविराम देताना माही विज म्हणाली की, प्रत्येकाला स्वतःच्या मेहनतीने उभे राहता आले पाहिजे. जोडीदार सोबत असताना आणि नंतरही आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचं आहे, असा सडेतोड संदेश तिने दिला.
काही दिवसांपूर्वीही तिने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईची चेतावणी दिली होती. आता ती पुन्हा एकदा ठामपणे पुढे आली आहे आणि अफवांवर शांत पण ठाम प्रत्युत्तर देत म्हणाली— सत्य तेव्हाच ऐका, जेव्हा मी स्वतः सांगेन.
हे पण वाचा.. “सकाळी स्टुडिओत गेलो आणि…” गिरीश ओक यांनी उघड केला रोहित आर्य प्रकरणाचा तपशील, घटनेच्या आदल्या दिवशीच झाली भेट
माही विज च्या या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांना लगोलग धडा मिळाला आहे.
हे पण वाचा.. दशावतारचा प्रभाव अजूनही तसाच! मृणाल ठाकूर भारावली; दिलीप प्रभावळकरांना दिली खास दाद









