rohit arya case marathi actor reveals last meeting : मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या रोहित आर्य प्रकरणानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलिस चकमकीत मृत्यू झालेल्या Rohit Arya या व्यक्तीबद्दल विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे या घटनेच्या आधी काही मराठी कलाकारांशी त्याचा संपर्क झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर वातावरण आणखी पेटले आहे. या कलाकारांमध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव, उर्मिला कोठारे, डॉ. गिरीश ओक यांची नावं समोर आल्यानंतर आता अभिनेता आयुष संजीवनेही एक उघड पोस्ट लिहून नवीन खुलासा केला आहे.
आयुषच्या म्हणण्यानुसार, ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधीच तो Rohit Arya ला भेटला होता. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आयुषने सांगितलं की, रोहितनं आगामी ‘Let’s Change 4’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर त्याला दिली होती. त्या भेटीदरम्यान तो पूर्णपणे सामान्य वागत असल्याचं आयुष म्हणतो. त्यानं दिलेली कथा आणि नंतर घडलेली वास्तविक घटना यांच्यात साम्य असल्याने ती गोष्ट अजूनही धक्कादायक वाटत असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं.
आयुषने पोस्टमध्ये आणखी लिहिलं की, जवळपास आठ–नऊ वर्षांपूर्वी रोहितच्या पहिल्या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांची भेट झाली होती. तेव्हापासून रोहित आर्य बद्दल शंका घ्यावी असं काहीच वाटलं नव्हतं. दोन दिवसांपूर्वी कार्यशाळेला भेट दिली असता तिथल्या मुलांसोबतही त्यानं फोटो काढला होता. “तेव्हा सगळं काही अगदी सुरळीत आणि नेहमीसारखंच होतं. पण आता जे घडलं, ते शब्दांत मांडणं कठीण आहे. देवाचे आभार, ती सर्व मुलं सुरक्षित आहेत,” असं आयुष म्हणाला.
पवईतील आरए स्टुडिओत बनावट ऑडिशनच्या निमित्तानं Rohit Arya ने जवळपास १०० विद्यार्थ्यांना बोलावलं होतं. नंतर १७ शाळकरी मुले आणि दोन वयोवृद्ध यांना ओलीस धरून त्यांना जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला गोळी मारल्याचं सांगितलं जातं.
हे पण वाचा.. दशावतारचा प्रभाव अजूनही तसाच! मृणाल ठाकूर भारावली; दिलीप प्रभावळकरांना दिली खास दाद
घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रातही खळबळ आहे. कलाकारांची नावं जोडली गेल्यानं अनेक गैरसमज निर्माण होत असून सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. आयुष संजीवची पोस्ट या चर्चेला आणखी वेग देणारी ठरली असून, पवईमधील ही दुर्दैवी घटना समाजात अनेक प्रश्न निर्माण करून गेलेली आहे.
हे पण वाचा.. चाहत्याच्या भावनिक मेसेजनं भारावला अभिनेता संकर्षण कर्हाडे; म्हणाला, “असं प्रेम मिळणं हीच खरी कमाई
rohit arya case marathi actor reveals last meeting










