yogita chavan saurabh chaughule spotted amid divorce buzz : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जीव माझा गुंतला’ मधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारे Yogita Chavan Saourabh Chaughule हे अभिनेता-अभिनेत्री त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या असून, याच पार्श्वभूमीवर दोघेही एकाच कार्यक्रमात दिसल्याने चाहत्यांचे लक्ष पुन्हा त्यांच्याकडे वळलं आहे.
अलीकडेच ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर पार पडला. या कार्यक्रमात Yogita Chavan Saourabh Chaughule दोघांनी हजेरी लावली, मात्र पूर्वीप्रमाणे एकत्र नव्हे तर वेगवेगळ्या वेळेला उपस्थित राहिले. सर्वप्रथम सौरभ कार्यक्रमाला पोहोचला, तर काही वेळाने योगिता साडीतील पारंपरिक लूकमध्ये हजेरी लावली. यामुळे त्यांच्या नात्यातील तणावाच्या चर्चेला पुन्हा जोर आला.
या आधी सोशल मीडियावर आणि मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तरीही सौरभ चौघुले यांनी या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. योगिता चव्हाणनेही वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळत “यावर बोलण्याची इच्छा नाही” असं सूचक वक्तव्य केलं आहे.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची ओळख निर्माण झाली आणि त्यातून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दीड वर्षाच्या नात्यानंतर दोघांनी ३ मार्च २०२४ रोजी विवाहबद्ध होत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
हे पण वाचा.. सईच्या मदतीने अखेर होणार भेट? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट
मात्र आता Yogita Chavan Saourabh Chaughule यांच्याविषयी वेगळं राहण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघेही अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असले तरी मनोरंजन विश्वात या चर्चांना वेगळंच वळण लागलं आहे. चाहत्यांना मात्र हे नातं पुन्हा जुळावं अशी मनापासून इच्छा असून त्यांच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









