lakshmi niwas twist janhvi vishwas fateful meet : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “लक्ष्मी निवास” सध्या उत्कंठेच्या शिखरावर पोहोचली आहे. कथेत एकामागून एक नवे वळण येत असून प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारे प्रसंग पाहायला मिळत आहेत. जान्हवीच्या आयुष्यात आलेल्या संकटांनंतर ती घेतलेला नवा अवतार, तिची बदललेली ओळख आणि विश्वाशी टाळलेली भेट या सगळ्यामुळे मालिकेत नाट्य आणखी रंगले आहे.
अलीकडील भागांत जयंतच्या जुलमी वागण्यामुळे हैराण झालेली जान्हवी समुद्रात उडी मारते. तिचा काहीही शोध न लागल्याने ती मृत्यू पावल्याचे सर्वांना वाटते. पण प्रत्यक्षात ती किनाऱ्यावर वाचते आणि पुन्हा जुन्या जाळ्यात अडकू नये म्हणून घरच्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेते. आपली खरी ओळख लपवत ती स्वतःला ‘तनुजा’ म्हणून ओळख करून देते.
योगायोगाने विश्वाच्या वडिलांचा जीव ती वाचवते आणि कृतज्ञतेपोटी ते तिला घरी आणतात. तिथे राहणारी जान्हवी म्हणजेच तनुजा आणि विश्वाची अद्याप समोरासमोर भेट झालेली नसते. मात्र त्यांच्या कॉलेजच्या आठवणी पुन्हा जाग्या करणारे संकेत कथेतून दिसू लागले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या ताज्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. सई विश्वाला घरात आलेल्या पाहुणीची विचारपूस करण्यास सांगते आणि विश्वा जान्हवीच्या खोलीच्या दारात येतो. दार उघडण्याच्या क्षणी दोघांच्याही भावना गलबलून येतात. मात्र, प्रोमो येथेच थांबतो आणि दोघे खरोखर आमनेसामने येतात की नाही, हे अजूनही रहस्यच आहे.
आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, सईमुळे विश्वा आणि जान्हवीची खरी ओळख उघड होणार का? विश्वा तिच्यासमोर यशस्वीरित्या उभा राहील का? आणि त्यांची भेट घडली तर मालिकेच्या कथानकात कोणते नवे वळण येईल?
लक्ष्मी निवास मालिकेतील हे रहस्यपूर्ण प्रसंग आणि जान्हवीच्या ओळखीचे गुपित कधी उघड होते, जयंत व इतरांना तिच्या जिवंत असल्याची माहिती कधी मिळते याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे. पुढील भागात हे गूढ उलगडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. नशिबाने वाचली! रोहित आर्य प्रकरणावर रुचिता जाधवचा धक्कादायक खुलासा; म्हणाली — ‘चित्रपटाचा सीन की जीवघेणा प्लॅन?









