ADVERTISEMENT

लक्ष्मी निवास’चा जयंत प्रेमात पडला स्क्रीनवर क्रूर प्रेमी… पण खऱ्या आयुष्यात रोमँटिक मेघन जाधवच्या फोटोपाठची प्रेमकहाणी चर्चेत

meghan jadhav secret engagement buzz : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत धाडसी भूमिका साकारणारा अभिनेता Meghan Jadhav आता त्याच्या ऑफस्क्रीन प्रेमकहाणीसाठी चर्चेत. अनुष्का पिंपुटकरसोबत शेअर केलेल्या खास फोटोंमुळे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.
meghan jadhav secret engagement buzz

meghan jadhav secret engagement buzz : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतच्या तीक्ष्ण आणि मानसिक गुंतागुंतीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा Meghan Jadhav पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्याची ऑनस्क्रीन व्यक्तिरेखा नाही, तर खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी आहे. सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मेघनने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एका मुलीचा हात त्याच्या हातात दिसत असून, दोघांच्या बोटांमध्ये अंगठी चमकत आहे. त्या फोटोलाच त्याने हार्ट इमोजी दिली आहे आणि ‘तुम हो तो…’ हे गाणे वापरले आहे. फोटो पाहताच चाहत्यांनी कमेंट विभागात शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी “खरंच साखरपुडा झाला का?” असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनेही आपल्या इंस्टाग्रामवर असेच फोटो शेअर केले आहेत. तिनेही तेच गाणे लावून हार्ट इमोजींचा वापर केला आहे. फोटोमध्ये मेघन आणि अनुष्का विविध ठिकाणी एकत्र दिसत असून, त्यातून त्यांच्या नात्याची जवळीक स्पष्ट दिसते. या पोस्ट्समुळे दोघे काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आता अधिकृतपणे मजबूत झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

या रोमँटिक फोटोंखाली मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्या पुगावकर, आशुतोष गोखले आणि विदिशा म्हसकरसह अनेकांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकत अभिनंदन केले आहे. चाहत्यांनीदेखील उत्साह व्यक्त करत “नव्या प्रवासासाठी शुभेच्छा”, “परफेक्ट जोडी” अशा प्रतिक्रिया दिल्या.

हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या सेटवरचा धमाकेदार फाईट सीन! अर्णव–ईश्वरीच्या ॲक्शन सिक्वेन्सचा व्हिडीओ चर्चेत

मेघनने मनोरंजन क्षेत्रात बालकलाकारापासून आपली कारकीर्द सुरू केली आणि आज मराठी सिरीयल्समध्ये तो ठामपणे आपली जागा निर्माण करत आहे. त्याच्या प्रतिभेसोबत आता त्याचे खासगी आयुष्यही चाहत्यांसाठी आकर्षण ठरत आहे. हे दोघे लवकरच नात्याबद्दल अधिकृत घोषणा करतील का? याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

हे पण वाचा.. मुंबईच्या स्वप्ननगरीत ‘माधवी निमकरने घेतलं दुसऱ्यादां घर आनंद शेअर करत म्हणाली – Dream in Progress…

meghan jadhav secret engagement buzz

meghan jadhav secret engagement instagram story

meghan jadhav instagram story