ADVERTISEMENT

माधवी निमकरची कोकण सफर; नारळ-सुपारीच्या बागेतून चालत पोहोचली समुद्रकिनाऱ्यावर, म्हणाली “हेच खरं सुख!”

madhavi nimkar kokan paradise moments : अभिनेत्री माधवी निमकर सध्या कोकणात आपल्या आजोळच्या गुहागर गावात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गावातील शांत वातावरण, नारळ-सुपारीची बाग आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य अनुभवत तिने चाहत्यांसोबत आनंदाचे क्षण शेअर केले आहेत.
madhavi nimkar kokan paradise moments

madhavi nimkar kokan paradise moments : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर सध्या तिच्या कोकण दौऱ्यामुळे चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली शालिनी ही तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. सध्या माधवीने तिच्या आजोळच्या गुहागर येथून काही सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर केला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

माधवी दरवर्षी आपल्या व्यग्र कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून कोकणात सुट्टी घालवायला जाते. यंदाही तिने आपल्या गावातील सुंदर वातावरणाचा आनंद घेताना चाहत्यांना त्या सुखद क्षणांची झलक दाखवली आहे. तिच्या घराच्या मागे भरगच्च हिरवीगार नारळ-सुपारीची बाग असून, काही अंतरावरच शांत, मोहक असा समुद्रकिनारा आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवणं म्हणजे तिच्यासाठी खरं सुख असल्याचं माधवी म्हणते.

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधवी म्हणते, “मी सध्या गुहागरमध्ये आहे. आमच्या वाडीतून चालत समुद्राकडे जाताना प्रत्येक क्षण स्वर्गीय वाटतो. स्वतःचं घर, आपल्या माणसांचा सहवास आणि समोर निळाशार समुद्र… याहून सुंदर क्षण आयुष्यात दुसरा नाही.”

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “हेच खरं सुख”, “कोकण म्हणजेच स्वर्ग” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर “गुहागर म्हणजे सुकून मिळण्याचं ठिकाण” असं लिहित माधवीच्या आनंदात सहभागी झाल्याचं व्यक्त केलं आहे.

माधवी निमकरचं कोकणाशी नातं अतूट आहे. ती दरवर्षी आपल्या कुटुंबासोबत गावाला जाऊन निसर्गात वेळ घालवते. तिच्या मते, कोकणाचं सौंदर्य आणि इथल्या मातीचा गंध प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा देतो.

हे पण वाचा.. अभिनेत्री दीप्ती केतकरचा खुलासा: “नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत नाही कारण…” – ट्रोलिंगवरही दिलं स्पष्ट उत्तर

दरम्यान, माधवीने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्वप्नांच्या पलीकडे’, ‘हम तो तेरे आशिक है’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमध्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे. त्यासोबतच ‘शेर शिवराज’ आणि ‘पावनखिंड’सारख्या चित्रपटांमध्येही तिने प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.

सध्या ती कोकणातील तिच्या आजोळच्या आठवणीत रमली असून, चाहत्यांना तिच्या या “खऱ्या सुखाच्या” क्षणांनी मोहित केलं आहे.

हे पण वाचा.. वडिलांच्या वाढदिवशी मंदार जाधवकडून खास सरप्राईज! नवीन गाडीचं घरात आगमन

madhavi nimkar kokan paradise moments