ADVERTISEMENT

आहारातून साखर पूर्णपणे बंद! ‘हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा फिटनेस मंत्र; दिल्या ५ खास हेल्थ टिप्स

priyadarshini indalkar fitness and health tips : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तिच्या अभिनयाइतकीच फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच तिने दिलेल्या मुलाखतीत तीने आपल्या दैनंदिन फिटनेस रुटीनपासून आहारातील सवयींपर्यंत सर्व खुलासा केला. साखर पूर्णपणे टाळण्यापासून सूर्यनमस्कारांपर्यंत, जाणून घ्या तिच्या हेल्थ टिप्स.
priyadarshini indalkar

priyadarshini indalkar fitness and health tips : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात ओळखली जाणारी प्रियदर्शिनी इंदलकर आज केवळ तिच्या अभिनयासाठी नव्हे तर तिच्या आरोग्यसजग जीवनशैलीसाठीही चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शिनीने तिच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं असून, तिच्या चाहत्यांसाठी काही उपयुक्त हेल्थ टिप्सही शेअर केल्या आहेत.

अभिनेत्रीने सांगितलं की ती तिच्या आहारात साखरेचं पूर्णपणे उच्चाटन केलं आहे. “साखर शरीरासाठी जितकी हानिकारक आहे, तितकंच ती सोडल्यावर शरीरात होणारा बदलही जाणवतो,” असं ती हसत म्हणाली. इतकंच नव्हे, तर ती दुधाचे पदार्थही टाळते. प्रियदर्शिनीचं मत आहे की नैसर्गिक आहार आणि नियमित व्यायाम हाच खरा सौंदर्याचा गाभा आहे.

प्रियदर्शिनीने चाहत्यांना दिलेल्या पाच हेल्थ टिप्स खूपच उपयुक्त आहेत. सकाळी उठल्याबरोबर चहा पिणं ती टाळते, कारण त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास वाढतो. दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्यांनी कमीत कमी एकदा चालायला जावं, असं ती सुचवते. तसेच सोशल मीडियावर दिसणाऱ्या आभासी फिटनेस गोल्सचा पाठलाग न करता, आपल्या शरीराची आणि क्षमतेची जाणीव ठेवावी, असं ती सांगते.

अभिनेत्रीचा व्यायामप्रेमही वेगळाच आहे. ती दररोज तब्बल १०० ते १०७ सूर्यनमस्कार घालते, मात्र हे ती फक्त शरीर तयार असताना आणि पुरेशी झोप झाल्यानंतरच करते. “फिटनेस म्हणजे केवळ वजन कमी करणं नव्हे, तर मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवणं,” असं ती म्हणते.

तिच्या फिटनेस प्रवासात दीक्षित डाएटचा मोठा वाटा असल्याचंही प्रियदर्शिनीने सांगितलं. एका चित्रपटासाठी तिला वजन कमी करावं लागलं होतं, तेव्हा ती १८ तासांचं इंटरमिटंट फास्टिंग करत होती. मात्र नंतर शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने ती आता १४ ते १६ तास फास्टिंगचा अवलंब करते.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत गोव्यात समुद्रकिनारी रंगणार समर-स्वानंदीचा ग्रँड विवाहसोहळा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रियदर्शिनी नुकतीच ‘दशावतार’ या चित्रपटात दिसली, ज्याने बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवलं. त्याचबरोबर ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली आहे. अल्पावधीतच अभिनय, सौंदर्य आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे प्रियदर्शिनी इंदलकर आज अनेक तरुणींसाठी फिटनेसची प्रेरणा ठरली आहे.

हे पण वाचा..  धनंजय पोवारची जान्हवी किल्लेकरसाठी खास कविता; शेवटी अभिनेत्रीने दिली धमकी, व्हिडीओ पाहिलात का?

priyadarshini indalkar fitness and health tips