dhananjay powar jahnavi killekar viral moment : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिजनमध्ये आपल्या विनोदी आणि हटके स्टाइलमुळे चर्चेत आलेला धनंजय पोवार म्हणजेच सर्वांचा लाडका डीपी दादा, आणि अभिनेत्री Jahnavi Killekar ही जोडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांची मैत्री ‘बिग बॉस’च्या घरात सुरू झाली होती. सुरुवातीला दोघे एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसले, पण दिवसागणिक त्यांच्या मधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आता पुन्हा एकदा ही जोडी एका मजेशीर व्हिडीओमुळे सोशल मीडियावर गाजत आहे.
अभिनेत्री Jahnavi Killekar नुकतीच धनंजय पोवारच्या नव्या दुकानाच्या उद्घाटनाला कोल्हापुरात उपस्थित होती. या भेटीनंतर दोघांनी एक रील बनवली असून ती चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडीओमध्ये धनंजयने जान्हवीसाठी खास कविता लिहिल्याचं सांगत ती वाचून दाखवली आहे.
तो म्हणतो,
“बिग बॉसच्या घरात एक चेहरा निराळा,
जिच्या सौंदर्याने मन मोहरून गेलं.
अंधारातली ती हसरी कमान,
चांदण्यांनी सजलेली झालर जणू वाटली अनोखी ओळख.”
धनंजयची ही कविता ऐकून जान्हवी थोडी लाजते आणि कौतुकाने म्हणते, “वाह दादा, हे माझ्यासाठीच लिहिलंय का?” यानंतर धनंजय तिला आणखी एक सुंदर कविता ऐकवतो, ज्यामध्ये तिचं रूप, तिची बोलण्याची ढब आणि तिचं मराठमोळं तेज याचं सुंदर वर्णन केलेलं असतं.
पण सगळ्यात मजेशीर प्रसंग व्हिडीओच्या शेवटी घडतो. शेवटची कविता ऐकल्यानंतर जान्हवी थोडी मिश्किलपणे म्हणते, “आणि हे सगळं ऐकून तुला पायतानांनी हाणलं आमची वहिनी!” म्हणजेच धनंजयच्या पत्नीला ती या कवितेबद्दल सांगणार असल्याची धमकी देते. हा क्षण ऐकून धनंजयचा चेहरा बघण्यासारखा होतो आणि नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “आता डीपी दादा संकटात”, “आईसाहेबांपासून सावधान”, “वहिनींनी पाहिलं की काम तमाम”, “आता चार दिवस दादाला जेवण मिळणार नाही” अशा मजेशीर प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिसून येत आहेत.
हे पण वाचा.. ‘कमळी’ची कमाल, ‘ठरलं तर मग’चा जलवा कायम! पाहा या आठवड्याची जबरदस्त TRP यादी
धनंजय पोवार आणि Jahnavi Killekar या जोडीचा हा मजेशीर संवाद चाहत्यांना पुन्हा ‘बिग बॉस’च्या आठवणीत घेऊन गेला आहे. त्यांच्या या विनोदी केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा धमाका अनुभवायला मिळाला आहे.









