mahesh manjrekar salman khan controversy antim set : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आणि खास दिग्दर्शनशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे महेश मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सलमान खानसोबत पुढे कधीही चित्रपट करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांच्या या विधानानंतर बॉलिवूड वर्तुळात चर्चा रंगली आहे.
‘माझा कट्टा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलताना महेश मांजरेकर यांनी ‘अंतिम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं, “मी सलमान खानसोबत ‘अंतिम’ हा चित्रपट केला. पण जर आता कोणी विचारलं की, तू पुन्हा सलमानसोबत काम करशील का? तर माझं उत्तर सरळ ‘नाही’ असं असेल. कारण सलमानला वाटतं, त्याला सिनेमाचं सगळं कळतं. त्याचे वडील लेखक आणि मेकर आहेत, पण मीही माझ्या मतांवर ठाम असतो.”
मांजरेकर पुढे म्हणाले, “शूटिंगच्या वेळी सलमान एकदा तीन वाजता सेटवर आला. त्यावेळी मी त्याच्यावर चिडलो. त्यानंतर तो म्हणाला, ‘तू मला शिव्या दिल्यास.’ मी त्याला सांगितलं, ‘मी तुला नाही, तुझ्यातल्या दिग्दर्शकाला शिव्या दिल्यात. तू आता माझा अभिनेता नाही, दिग्दर्शक म्हणून पिक्चर दिलास तर मग ती जबाबदारी माझी आहे.’”
या खुलाशामुळे सलमान आणि महेश यांच्या नात्यातील व्यावसायिक मतभेद स्पष्टपणे दिसून आले. दोघांची मैत्री जुनी असली तरी कामाच्या बाबतीत महेश मांजरेकर कधीही तडजोड करत नाहीत, हे त्यांनी या वक्तव्यातून दाखवून दिलं.
महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मराठी सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक होता. मात्र, ‘मुळशी पॅटर्न’ला मिळालेल्या यशाच्या तुलनेत ‘अंतिम’ला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या ऐतिहासिक चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून तो ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे पण वाचा.. भाऊबीजेला फोन न केल्याने अंकिता वालावलकरची खंत; धनंजय पोवारने मागितली माफी, म्हणाला..
महेश मांजरेकर यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ‘अंतिम’नंतर ते सलमानसोबत काम करणार नाहीत, असं स्पष्टपणे सांगून त्यांनी स्वतःच्या विचारांचा ठामपणा दाखवून दिला आहे.
हे पण वाचा.. ‘सैराट’ फेम Tanaji Galgunde गावात करतोय शेती; स्वतःच्या हातांनी बनवतो जेवण, चाहत्यांनी केल कौतुक
mahesh manjrekar salman khan controversy antim set









