ADVERTISEMENT

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवचा खतरनाक अवतार!

siddharth jadhav new look punha shivaji raje bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त आणि धक्कादायक लूक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या भूमिकेद्वारे तो आपल्या अभिनय कारकिर्दीतील एक नवे पर्व सुरू करतोय.
siddharth jadhav new look punha shivaji raje bhosale

siddharth jadhav new look punha shivaji raje bhosale : मराठी चित्रपटसृष्टीतील बहुमुखी अभिनेता Siddharth Jadhav पुन्हा एकदा नव्या आणि दमदार रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी चित्रपटातील सिद्धार्थचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थचा चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला दिसतोय. नजरेतील तीव्रता, कपाळावरील व्रण आणि चेहऱ्यावर झळकणारा क्रौर्य — हे सर्व त्याच्या पात्राच्या खोलीची जाणीव करून देतात. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे की, नेमकं सिद्धार्थ कोणती भूमिका साकारत आहे.

सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी हा विशेष लूक प्रदर्शित करण्यात आला आणि त्याच्या चाहत्यांसाठी तो एक वेगळाच सरप्राईज ठरला. आतापर्यंत आपल्या विनोदी आणि हलक्याफुलक्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ यावेळी पूर्णतः वेगळ्या छटेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार केलं असून, हा लूक पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना Siddharth Jadhav म्हणतो, “ही भूमिका माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात वेगळी आहे. महेश सरांनी माझ्या एका फोटोवरून हा लूक डिझाइन केला आणि जेव्हा मी तो पाहिला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. इतक्या वेगळ्या स्वरूपात मी स्वतःलाच ओळखू शकलो नाही. पण महेश सरांचा दिग्दर्शनावरील विश्वास पाहता मी ही भूमिका पूर्ण ताकदीने साकारत आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, सयाजी शिंदे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

हे पण वाचा.. दिवाळीचा आनंद द्विगुणित! अभिनेत्री अनुजा साठेचं ‘नवं घरकुल’, चाहत्यांना दाखवली खास झलक

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची कथा आणि पटकथा स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिली असून, संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून, झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सिद्धार्थ जाधवचा हा नवा अवतार त्याच्या अभिनयातील वैविध्य पुन्हा एकदा सिद्ध करतोय. सोशल मीडियावर या लूकबद्दल उत्साहाचं वातावरण असून, मराठी चित्रपटसृष्टीत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट एक वेगळी छाप सोडेल, अशी सर्वत्र चर्चा आहे.

हे पण वाचा.. भाऊबीजेच्या दिवशी शशांक केतकरने दाखवला लेकीचा चेहरा; राधाच्या क्यूट स्माईलने जिंकली सगळ्यांची मनं

siddharth jadhav new look punha shivaji raje bhosale