sharayu sonawane paru fame bad experience : मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री शरयू सोनावणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘पारू’ मालिकेतल्या तिच्या दमदार अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. नुकतीच तिने दिलेल्या एका खास मुलाखतीत तिने तिच्या कामाविषयी, भूमिकांबद्दल आणि खासगी आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल उघडपणे सांगितलं आहे.
शरयू सध्या ‘पारू’ या मालिकेत झळकत असली, तरी तिला खरी प्रसिद्धी ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेतल्या पिंकीच्या भूमिकेने तिला प्रचंड ओळख मिळवून दिली. या पात्राविषयी बोलताना ती म्हणाली, “पिंकी ही नेहमीच्या साचेबद्ध नायिकांसारखी नव्हती. ती मजबूत, ठाम आणि कोणाचंही ऐकून चालणारी नव्हती. त्यामुळेच लोकांना ती भूमिका अधिक भावली.”
तिने पुढे सांगितलं की, भविष्यातही तिला ‘पारू’सारखीच धाडसी आणि बळकट भूमिका साकारायला आवडेल. याचवेळी मुलाखतीदरम्यान तिला विचारलं गेलं की, “तू खऱ्या आयुष्यातही अशीच धाडसी आहेस का?” यावर शरयूने हसत उत्तर दिलं – “होय, कारण माझे बाबा पोलिस आहेत. आमच्याकडे लहानपणापासून शिकवलं गेलंय की वाईट वागणाऱ्यांना थांबवायचं, घाबरायचं नाही. माझ्या भावानेही अशा प्रसंगांत नेहमी योग्य भूमिका घेतली आहे.”
यानंतर शरयूने तिच्या आयुष्यातील एका वाईट आणि अविस्मरणीय अनुभवाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मी आणि माझी आई एकदा रात्री साडेआठच्या सुमारास चर्चगेट स्टेशनवरून चालत होतो. अचानक एका माणसाने मला घाणेरड्या पद्धतीने धक्का दिला आणि विचित्र प्रकारे हात लावला. माझी आई पुढे चालली होती आणि तिला काही समजलं नाही. पण मी मागे थांबले नाही – सरळ त्या माणसाच्या मागे धाव घेतली, त्याला पकडलं आणि पोलिस ठाण्यात नेलं.”
हा प्रसंग सांगताना शरयू म्हणाली, “अशा गोष्टी मी कधीच सहन करत नाही. कोणीतरी वाईट वागलं तर त्याला थांबवणं गरजेचं आहे. मी घाबरणाऱ्यांपैकी नाही.”
हे पण वाचा.. ७ महिन्यांनंतर ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेने दाखवला लेकीचा चेहरा Tharala Tar Mag Monika Dabade Baby
शरयू सोनावणेचा हा प्रसंग ऐकून अनेक प्रेक्षकांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. समाजमाध्यमांवर “बाईपण जिंदाबाद” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘पारू फेम शरयू सोनावणे’ हिने दाखवलेलं धैर्य आजच्या तरुणींना प्रेरणा देणारं ठरत आहे.
हे पण वाचा.. ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम आलापिनी निसळने आईसोबत बनवल्या चकल्या; दिवाळीचा खास व्हिडिओ झाला व्हायरल
sharayu sonawane paru fame bad experience









