akshay kelkar first Diwali festival with wife : दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह, रोषणाई आणि कुटुंबासोबतचा सणाचा गोडवा! या उत्साहात आता लोकप्रिय मराठी अभिनेता Akshay Kelkar देखील सहभागी झाला आहे. नुकताच त्यानं पत्नी साधना काकतकरसोबत त्याच्या आयुष्यातील पहिला दिवाळसण मोठ्या उत्साहात साजरा केला असून, त्याची खास झलक त्यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अक्षय केळकर हा सध्या ‘काजळमाया’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत असून, त्याची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे. लग्नानंतरचा हा पहिला दिवाळी सण त्याच्यासाठी आणि साधनासाठी अतिशय खास ठरला. दोघांनी या सणाच्या निमित्तानं घर सजवण्यापासून ते फराळ बनवण्यापर्यंत सगळं एकत्र केलं. या सुंदर क्षणांचा व्लॉग अक्षयने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे, ज्यात दोघेही बालसुलभ आनंदात गुंग झाल्याचं पाहायला मिळतं.
व्हिडिओमध्ये अक्षय त्याच्या पत्नीस सजावटीसाठी मदत करताना दिसतो. दोघे त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी शेअर करत हसत-खेळत सण साजरा करतात. पुढे साधना त्याला उटणे लावते आणि दोघे मिळून फराळाचा आस्वाद घेतात. एकमेकांना फराळ खाऊ घालतानाचा त्यांचा संवाद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवतो. त्यानंतर बाल्कनीत फुलबाजे पेटवत अक्षयचा बालपणीचा आनंद पुन्हा उजळतो. शेवटी या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि प्रेम, एकत्रता आणि आनंदाचा संदेश दिला.
Akshay Kelkar सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. कामातील अपडेट्सपासून वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांपर्यंत तो आपल्या चाहत्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधतो. त्यामुळे त्याचा प्रत्येक व्हिडिओ आणि पोस्ट काही तासांतच व्हायरल होतो.
कलाक्षेत्रातील त्याच्या प्रवासाकडे पाहिलं तर, अक्षयने ‘बिग बॉस मराठी ४’मध्ये आपली वेगळी छाप पाडली होती. त्यानंतर ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘अबीर गुलाल’ मालिकेत त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. आता ‘काजळमाया’ मालिकेतून तो पुन्हा एकदा आपली दमदार उपस्थिती दाखवत आहे.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag 21 October मैना केली सायलीच्या कपाटातून चोरी, अश्विन समोर आणणार सदाशिव मैनाचा खरा चेहरा
नुकतंच ९ मे रोजी अक्षयने त्याची दीर्घकाळची प्रेयसी साधना काकतकर हिच्याशी लग्न केलं. दहा वर्षांच्या नात्यानंतर लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याचा पहिला दिवाळसण विशेष ठरला आहे. त्यांच्या सणाच्या आनंदी क्षणांनी चाहत्यांच्या मनातही सणाचा आनंद दुणावला आहे.
akshay kelkar first Diwali festival with wife









