ADVERTISEMENT

१ जानेवारीला प्रदर्शित होणार हेमंत ढोमेचा ‘क्रांतिज्योती विद्यालय’; प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण KrantiJyoti Vidyalay

KrantiJyoti Vidyalay Movie ‘झिम्मा’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ सारख्या हिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला नव्या चित्रपटासह येत आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या सिनेमाद्वारे मराठी शाळांचा अभिमान आणि मातृभाषेचं महत्त्व नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ‘मोस्टली सेन’ म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
KrantiJyoti Vidyalay

KrantiJyoti Vidyalay Movie Date : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा नव्या विषयासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती आणि आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख तसेच स्टारकास्टची माहितीही अधिकृतपणे जाहीर झाली आहे. हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग या यशस्वी जोडीचा हा आणखी एक मनोरंजक प्रकल्प असणार आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ( KrantiJyoti Vidyalay marathi madhyam ) हा सिनेमा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “आता मराठी शाळा पुन्हा भरणार!” या आशयाचा संदेश देत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून त्यावरूनच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाची कथा मराठी शाळांच्या घटत्या संख्येवर आणि मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या महत्त्वावर आधारित आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आलेली ही कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फळी झळकणार आहे — सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील. मात्र, सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे प्राजक्ता कोळीचं मराठी चित्रपटातलं पहिलं पाऊल.

‘मोस्टली सेन’ या नावाने ओळखली जाणारी प्राजक्ता कोळीने यूट्यूब आणि वेब सीरिज ‘मिसमॅच्ड’च्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. आता ती आपल्या मातृभाषेतील सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत असून, तिच्या चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, KrantiJyoti Vidyalay हा विषय माझ्या मनाजवळचा आहे. मराठी शाळा म्हणजे आपल्या संस्कृतीचं मूळ आहे, आणि या चित्रपटाद्वारे आम्ही त्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळेल, याचा मला विशेष आनंद आहे.”

लग्नाआधी ५ दिवस क्रूजवर अडकले शिवानी-विराजस; प्रपोजचा किस्सा सांगत हसले दोघेही

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर मराठी भाषेचा गौरव वाढवणारा सामाजिक संदेशही देणारा ठरणार आहे. मराठी शाळांविषयीचा अभिमान आणि आत्मीयता जागवणारा हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना एक भावनिक अनुभव देईल, यात शंका नाही.