salman khan balochistan mention controversy : सौदी अरेबच्या रियाधमध्ये झालेल्या जॉय फोरम २०२५ मध्ये सलमान खानच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार वाद निर्माण झाला आहे. अभिनेता सलमान खानने बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा स्वतंत्र उल्लेख करत हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेबाबत आपली मते व्यक्त केली, ज्यामुळे अनेक युजर्सने त्याला ट्रोल केले आहे.
सलमान खानच्या त्या क्लिपमध्ये दिसून आले की, त्यांनी म्हटले, “जर तुम्ही हिंदी चित्रपट येथे प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट होईल. तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपटही येथे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतील, कारण येथे अनेक देशांतून आलेले लोक आहेत – बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून.” सलमानने यावेळी सौदी अरबमध्ये भारतीय चित्रपटांची लोकप्रियता आणि मध्यपूर्व व दक्षिण आशियाई प्रेक्षकांवर त्यांचा प्रभाव याबाबतही चर्चा केली.
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जलद प्रतिसाद दिसला. काही लोकांनी सलमानच्या स्पष्ट आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या या विधानावर टीका केली. अनेकांनी विचारले की, बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख करून सलमानने कोणता संदेश दिला? काही युजर्सचा असा विश्वास आहे की त्यांनी हे विधान जाणूनबुजून केले, तर काहींनी म्हटले की ही फक्त चूक होती.
सलमानच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद, ट्रोलिंग आणि चर्चांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. काहींना वाटते की बलुचिस्तानच्या वेगळ्या राजकीय ओळखीचा उल्लेख करणं योग्य आहे, तर काही युजर्सने त्याला राजकीय बॉम्ब फेकल्यासारखे वर्णन केले. तरीही, सलमान खानच्या या चर्चेतून स्पष्ट दिसते की त्यांचे वक्तव्य व्यावसायिक दृष्टिकोनातून भारतीय चित्रपटांच्या जागतिक लोकप्रियतेवर केंद्रित होते.
हे पण वाचा.. ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन; ‘शोले’तील “अंग्रेजो के जमाने का जेलर” काळाच्या पडद्याआड Asrani Death
प्रेक्षक आणि सोशल मीडिया युजर्स आता चर्चेत भाग घेत आहेत आणि सलमानच्या या विधानावरून विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे या विषयावर अनेकांची मतं आणि वाद सुरू आहेत, आणि सोशल मीडिया वरून हा प्रकरण अजूनही चर्चेचा विषय आहे.
हे पण वाचा.. श्वास घ्यायलाच त्रास होतोय…” दुसऱ्यांदा आई होणाऱ्या भारती सिंगचा भावनिक खुलासा; म्हणाली..
salman khan balochistan mention controversy
I don’t know if it was slip of tongue, but this is amazing! Salman Khan separates “people of Balochistan” from “people of Pakistan” .
— Smita Prakash (@smitaprakash) October 19, 2025
pic.twitter.com/dFNKOBKoEz









