tharala tar mag purna aaji slap scene : मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली ठरलं तर मग ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेतील सर्वात भावनिक आणि ताकदीचा सीन अलीकडेच प्रेक्षकांसमोर आला असून त्यात पूर्णा आजीनं प्रियावर दिलेला दणका सध्या सोशल मीडियावरही जोरदार गाजतोय. अन्नपूर्णा निवासात घडलेल्या या प्रसंगानं संपूर्ण सुभेदार घराणं हादरलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, ती वेळ अखेर आली. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगडी पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या दमदार अभिनयामुळे मालिकेला नवसंजीवनी मिळेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
सध्या मालिकेत प्रियाच्या आयुष्याचं रहस्य सर्वांसमोर येण्याची भीती तीव्र झाली आहे. मिस्टर आणि मिसेस लोखंडे हेच तिचे खरे आई-वडील आहेत हे प्रियाला ठाऊक आहे, पण घरातील इतरांना ते सायलीचे पालक असल्याचं वाटतं. आपलं भांडं फुटेल या भीतीने प्रिया आता लोखंडेंना घराबाहेर काढण्याचा निर्णय घेते. पैशासाठी ढोंग केलं जातंय, असं म्हणत ती त्यांचा अपमान करते आणि धक्के देत घराबाहेर हाकलते.
या सगळ्या गोंधळात मिसेस लोखंडे खाली पडतात. त्याच वेळी सर्वांची लाडकी पूर्णा आजी घरात प्रवेश करते आणि परिस्थिती हाताळते. प्रियाच्या उद्धट वर्तनाने संतप्त झालेल्या आजीनं तिच्या कानशिलात लगावल्याने घरभर शांतता पसरते. “हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचा अपमान होत नाही,” असं ठणकावून सांगत आजीनं प्रियाला चांगलाच धडा शिकवला. तिच्या एन्ट्रीनं सगळं वातावरणच बदलून गेलं.
विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्णा आजीचा पुनरागमनाचा हा सीन दाखवण्यात येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान रात्री ८:३० वाजता हे विशेष भाग प्रसारित होतील. या सीनमुळे कथानकाला नवं वळण मिळणार आहे. प्रियाचं खरं सत्य कधी बाहेर येणार, मधुभाऊ शुद्धीवर येतील का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा चेहरा! रोहिणी हटंगडी साकारणार पूर्णा आजीची भूमिका; सेटवरचं स्वागत खास पद्धतीनं
‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीचं हे कमबॅक दृश्य चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील नाट्यमय वळणामुळे प्रेक्षकांचा उत्साह पुन्हा वाढला असून सोशल मीडियावर या सीनचे क्लिप्स प्रचंड व्हायरल होत आहेत. दिवाळी विशेष भागात हा भावनिक आणि प्रभावी क्षण पाहायला मिळणार आहे, हे नक्की!
हे पण वाचा.. “माझ्या अपघाताची बातमी पसरली…”, अभिनेता ajinkya deo यांचं स्पष्टिकरण; व्हिडिओने चाहत्यांना दिलासा!









