tharala tar mag rohini hattangadi new purna aji : गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय मालिकेचं नाव घेतलं तर ‘Tharala Tar Mag’ ही मालिका अग्रेसर आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राशी प्रेक्षकांनी एक वेगळी नाळ जुळवली आहे. विशेषतः पूर्णा आजी या पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. काही दिवसांपूर्वीच हे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर मालिकेतील एक महत्त्वाचा आधारच हरवला. संपूर्ण महाराष्ट्रासोबतच मालिकेच्या टीमलाही त्यांचा विरह पचवणं कठीण गेलं.
तथापि, ‘शो मस्ट गो ऑन’ या सूत्रानुसार निर्मात्यांनी हे प्रिय पात्र पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा सुरू होती की, पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? या चर्चांना अखेर विराम मिळाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी या पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकणार आहेत. याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून, त्यांच्या सेटवरील पहिल्या दिवसाच्या झलकाही शेअर करण्यात आल्या आहेत.
रोहिणी हटंगडी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “‘Tharala Tar Mag’ ही माझी आवडती मालिका आहे. ही भूमिका स्वीकारताना मनात आनंदासोबतच जबाबदारीचीही भावना आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेत आहे. ज्योती ताईंसोबत माझी जुनी मैत्री होती. त्यांनी ही भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवली होती. आता तीच उंची कायम ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनीही मला तितक्याच प्रेमानं स्वीकारावं, हीच इच्छा.”
रोहिणी ताईंना पूर्णा आजीच्या रुपात पाहून संपूर्ण टीम भारावली आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने सांगितलं, “रोहिणी ताईंसोबत काम करण्याची संधी मिळणं आमच्यासाठी मोठं भाग्य आहे. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे आमच्या सेटवरचं वातावरण आणखीन समृद्ध झालं आहे.”
हे पण वाचा.. “तो १ रुपया आयुष्यभर उधार राहील…” अतुल परचुरेंच्या आठवणीत ‘Sunil Barve’चे अश्रू अनावर
रोहिणी हटंगडी यांच्या या एन्ट्रीमुळे मालिकेला नवी ऊर्जा मिळाल्याचं स्पष्ट जाणवतं. प्रेक्षकांसाठीही हा बदल भावनिक ठरणार आहे. पूर्णा आजी पुन्हा मालिकेत परतत असल्याने नक्कीच अनेक चाहत्यांच्या डोळ्यांत आनंद झळकणार आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये ‘Tharala Tar Mag’ मध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
रात्री साडेआठ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. “माझ्या अपघाताची बातमी पसरली…”, अभिनेता ajinkya deo यांचं स्पष्टिकरण; व्हिडिओने चाहत्यांना दिलासा!
tharala tar mag rohini hattangadi new purna aji









