bigg boss 19 home malti nehal drama : ‘बिग बॉस १९’च्या घरात वाद-विवादांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाहीये. घरात नुकत्याच दाखल झालेल्या मालती चहरने पुन्हा एकदा चर्चेचं केंद्रबिंदू बनवलं आहे. यावेळी मालती आणि नेहालमध्ये झालेल्या तणावपूर्ण वादामुळे वातावरण तापलं असून तिच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
या आठवड्यात नेहाल घराची कॅप्टन झाल्याने तिच्या प्रत्येक कृतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच स्वयंपाकघरात झालेल्या छोट्याशा गोष्टीवरून मालती आणि नेहालमध्ये जोरदार शब्दयुद्ध पेटलं. नेहालने रव्याचा शिरा बनत असल्याचं सांगितलं आणि त्या विषयावर कोणीही भाष्य करू नये अशी अट घातली. त्यावर मालतीने “खराब बनेल…” असं म्हटल्याने वादाला सुरुवात झाली.
वादात अचानक बसीरने हस्तक्षेप करत मालतीला सुनावलं, “तू काय बोलतेस ते तुला कळत नाही का?”. यावर भडकलेल्या मालतीने प्रत्युत्तर देत, “तू मध्ये का बोलतोस? मध्ये येऊन बकवास करतोस”, असं उलटसुलट बोलली. यानंतर नेहालही मागे हटली नाही. तिने मालतीला उद्देशून, “तो बोलतोय तर काय झालं? कुठूनही येऊन लोकांना विचारतात तुम्ही आयुष्यात काय केलंय? तू आयुष्यात काय केलंस?”, असं टोला लगावला.
नेहालच्या या वक्तव्यामुळे मालती चहर संतापली आणि तिने मर्यादा ओलांडत नेहालच्या कपड्यांवर वादग्रस्त टिप्पणी केली. ती म्हणाली, “आधी कपडे घालून ये आणि मग माझ्याशी बोल”. या वक्तव्याने घरात एकच खळबळ उडाली. घरातील सदस्यांना मालतीचं बोलणं ऐकून विश्वास बसला नाही. कुनिका सदानंदनेही थेट प्रश्न केला, “तू काय म्हणालीस?”
या घटनेचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मालतीवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्याला ‘शर्मनाक’ आणि ‘अनुचित’ ठरवत ट्रोल केलं आहे. काही प्रेक्षकांनी ‘बिग बॉस 19’च्या नियमांनुसार अशा वक्तव्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तर काहींनी मालतीने सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशीही भूमिका घेतली आहे.
हे पण वाचा.. टीआरपी क्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस १९’ मध्ये धमाकेदार पुनरागमनाची चर्चा !
बिग बॉसच्या घरात वाद आणि भावनिक नाट्य ही नवी गोष्ट नाही. पण कपड्यांवरून केलेली अशी टिप्पणी महिला स्पर्धकांमधील आदराच्या मर्यादांचा भंग करणारी असल्याचं अनेकांचं मत आहे. या वादानंतर पुढील भागात बिग बॉसची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
हे पण वाचा..“तुम्ही कायम आठवणीत राहाल…” पंकज धीर यांच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी यांची भावनिक पोस्ट
