navri mile hitlerla vallari viraj video : लोकप्रिय टीव्ही शो ‘नवरी मिळे हिटलरला’ मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Vallari Viraj पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती मालिकेमुळे नव्हे, तर तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडीओत वल्लरीसोबत तिची ऑनस्क्रीन बहिण आलापिनी निसळ झळकली असून, दोघींनी एकही शब्द न उच्चारता भावनिक संदेश दिला आहे.
या व्हिडीओमध्ये ‘इन दिनों’ हे गाणं पार्श्वभूमीला ऐकायला मिळतं. त्यात दोघींच्या आयुष्यात काहीतरी चुकत असल्याचं सूचित होतं. दोघी निराश, एकट्या पडलेल्या दिसतात आणि स्वतः विषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्याचं दाखवलं जातं. मात्र, त्याच क्षणी त्या एकमेकींचं दुःख ओळखतात, एकमेकींना आधार देतात आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या अभिनयातून ‘एकत्र राहिलं, तर संकटातही मार्ग सापडतो’ हा अर्थपूर्ण संदेश प्रभावीपणे पोहोचतो.
आरशात स्वतःकडे पाहताना त्यांना आपली प्रतिमा नकोशी वाटते, पण जेव्हा त्या एकमेकींच्या नजरेतून स्वतःकडे पाहतात, तेव्हा त्यांना स्वतःचं खरं सौंदर्य जाणवतं. ही दृश्यं पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येणं साहजिकच आहे. अभिनयाच्या माध्यमातून दोघींनी मनाला भिडणारी भावना व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरी विराजने लिहिले आहे, “जेव्हा तुमच्या आयुष्यात खरी माणसं असतात, तेव्हा कोणतीही परिस्थिती पार करणं अवघड राहत नाही.” तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उसळल्या आहेत. अनेकांनी या सादरीकरणाचं कौतुक करत हार्ट इमोजी आणि प्रेरणादायी कमेंट्स शेअर केल्या आहेत.
“कमाल”, “तुमची बॉण्डिंग अफलातून आहे”, “एक्सप्रेशन राणी”, “खूप सुंदर संदेश दिला” अशा कमेंट्सचा पाऊस तिच्या व्हिडीओखाली पडत आहे. काहींनी दोघींच्या केमिस्ट्रीचे विशेष कौतुक केले आहे.
वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांच्या डान्स व्हिडीओंनी यापूर्वीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आगळ्यावेगळ्या संकल्पना, अभिव्यक्ती आणि हृदयाला भिडणारे सादरीकरण यामुळे त्यांचे व्हिडीओ सतत चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी केवळ अभिनयातून सकारात्मकता आणि साथ देण्याचं महत्व अधोरेखित केलं आहे.
या हृदयस्पर्शी व्हिडीओमुळे वल्लरी विराज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्कं करत आहे, हे नक्की!
हे पण वाचा.. Kamli ready for the election इलेक्शनसाठी कमळी सज्ज! कामिनीचा गौरी शोध मोहीमेत नवा ट्विस्ट – पाहा प्रोमो







