ADVERTISEMENT

विशाल निकम घेऊन येतो ‘येड लागल प्रेमाच’ मध्ये दमदार नरसिंह रूप, पाहा व्हिडीओ!

vishal nikam yed lagla premacha narsinha avatar : स्टार प्रवाहच्या 'येड लागल प्रेमाच' मालिकेत प्रेक्षकांसाठी एक रोमांचक वळण आले आहे. विशाल निकमचा नरसिंह अवतार आणि त्यासाठी घेतलेली मेहनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
vishal nikam yed lagla premacha narsinha avatar

vishal nikam yed lagla premacha narsinha avatar : स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी ‘येड लागल प्रेमाच’ मालिकेची कथा सध्या प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. दसऱ्याच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या जल्लोषात अचानकच जयच्या कुरापतींमुळे अचानक थरार निर्माण होतो. रुक्मिणी मंदिरात आलेल्या भक्तांचे जीव धोक्यात टाकण्याचा त्याचा प्रयत्न मालिकेतील प्रमुख वळण ठरतो. मात्र, देवाच्या कृपेने आणि धाडसाने राया या प्रसंगात नरसिंहाचा अवतार धारण करतो आणि सर्वांच्या मदतीला धावून येतो.

या रोमांचक सीनसाठी ‘येड लागल प्रेमाच’ टीमने विशेष मेहनत घेतली आहे. अभिनेता विशाल निकम, जो राया या भूमिकेत दिसतो, म्हणतो की त्याला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल तो स्वतःला नशीबवान समजतो. “दख्खनचा राजा ज्योतिबा साकारल्यानंतर आता ‘येड लागल प्रेमाच‘ मालिकेत नरसिंह अवतार साकारण्याची संधी मिळाली आहे. या अवतारासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला असून, दोन तासांच्या मेहनतीनंतर हे रुप तयार झाले,” असे विशाल यांनी सांगितले.

विशाल पुढे म्हणतात, “हा सीन शूट करण्यापूर्वी आठवडाभर तयारी करण्यात आली होती. शूटिंग दरम्यान, मी काही खाऊ शकत नव्हतो; फक्त पाणी आणि ज्यूस घेऊन दिवस संपवावा लागला. टीमने संपूर्ण काळजी घेतली. देवाचा आशीर्वाद आणि टीमच्या मेहनतीमुळेच हे सीन यशस्वीपणे शूट केले गेले.”

या अवतारात विशाल स्वतःला ओळखू शकले नाहीत असे ते सांगतात. त्यांनी स्पष्ट केले की, “हा अनुभव अत्यंत आनंददायक आणि आव्हानात्मक होता. प्रेक्षकांना हा नरसिंह अवतार नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

सोशल मीडियावर या सीनचा व्हिडीओ प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे आणि त्यावर चांगली प्रतिक्रिया येत आहे. ‘Yed Lagla Premacha’ मालिकेचे निर्माते आणि टीम यासाठी खूप मेहनत घेत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना थरार आणि मनोरंजन यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

हे पण वाचा.. “ती फक्त संवाद पाठ करत नाही…” तेजश्री प्रधानबद्दल सुबोध भावे भावूक; ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षक झाले फिदा!

प्रेक्षक आणि मालिकेचे चाहते या नव्या वळणासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत, आणि विशाल निकमच्या नरसिंह अवताराने मालिकेला नवे आयाम दिले आहे.

हे पण वाचा.. ‘बिग बॉस १९’ मधील अशनूर कौरची हुशारी आणि समजूतदारपणावर आई-वडिलांनी केले कौतुक

vishal nikam yed lagla premacha narsinha avatar