tanya mittal luxury life troll : तान्या मित्तल हिचं ‘Bigg Boss 19’ मधील आगमन झाल्यापासूनच तिच्या बोलण्यापासून ते जीवनशैलीपर्यंत सर्वकाही चर्चेत आहे. ग्वाल्हेर येथील ही तरुण उद्योजिका व इन्फ्लुएन्सर शोमध्ये आली तेव्हाच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. लक्झरी गोष्टींमुळे चर्चेत आलेल्या तान्याविषयी अलीकडेच एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीनं थेट टीका करत खळबळ माजवली आहे.
तान्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश करतानाच ५०० हून अधिक साड्या, तब्बल ५० किलो वजनाचे दागिने आणि स्वतःची चांदीची भांडी व बाटली घेऊन आली होती. एवढंच नाही तर शो दरम्यान तिने मोठेपणाचा तोरा मिरवणारी अनेक वक्तव्ये केली. “मी फक्त ग्वाल्हेरहून आग्याला कॉफी प्यायला जाते”, “माझं बिस्कीट लंडनहून मागवलं जातं”, “माझी आवडती डाळ मिळाली नाही तर मी उपाशी राहते” अशा विधानांमुळे तान्या मित्तल चर्चेत आली.
या लक्झरी वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी ती फक्त प्रसिद्धीसाठी असं करत असल्याचं मत व्यक्त केलं.
अलीकडेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Chahat Pandey हिने तान्याच्या या दाव्यांवरून जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, “मला वाटतं आता मला तान्याचं घर बघायलाच हवं. बिग बॉस संपल्यानंतर तिनं मला आणि लोकांना तिच्या घरी बोलावावं. मी सगळ्यांना तिचं घर दाखवेन, जेणेकरून आम्हाला हे समजेल की तिच्या घरासमोर फाईव्ह स्टार की सेव्हन स्टार कमी पडतात का?”
चाहतने यावेळी तान्याच्या ‘डाळ’ आणि ‘कॉफी’विषयीच्या मोठेपणाच्या विधानांवरही जोरदार टोमणा मारला. ती पुढे म्हणाली, “सुरुवातीला तिचं बोलणं थोडं मजेदार वाटलं, पण आता प्रत्येक गोष्टीत ती खोटी वाटते. तिचं वागणंच एवढं बनावट आहे की बघूनच चीड येते.”
तान्या मित्तलच्या या विधानांमुळे शोच्या प्रेक्षकांमध्येही ती एक चर्चेचा विषय ठरली आहे. काहींना तिची ही बोलण्याची स्टाईल मनोरंजक वाटते, तर काहींना ती पूर्णपणे बनावट वाटते. सोशल मीडियावर तिच्या वक्तव्यांवरून मोठ्या प्रमाणात मीम्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss 19 : नीलम गिरीची सलमान खानवर नाराजी; म्हणाली, “आमचं कधीच कौतुक केलं जात नाही”
‘बिग बॉस १९’मधील अनेक स्पर्धक सध्या आपापल्या रणनीतीत व्यस्त आहेत, मात्र तान्या मित्तलने आपल्या लक्झरी स्टाईल आणि बडेजावदार वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत पांडेच्या या थेट टीकेनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली असून तान्या यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. अमृता माळवदकर लग्नबंधनात अडकली! ‘हास्यजत्रे’शी आहे नवऱ्याचं खास नातं Amruta Malwadkar Wedding









